औरंगाबाद : आर्थिक दुर्बल घटकातील पाल्यांसाठी आरटीईअंतर्गत तरतूद करण्यात आली आहे मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायदा म्हणजेच आरटीई अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. मात्र या योजनेचा फायदा पात्र नसलेले अनेक लोक उचलत असल्याचे प्रकार समोर येत असल्याने आरटीई बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
गंगापूरचे गटशिक्षण अधिकारी अनिलकुमार सकदेव यांच्या मुलाचा औरंगाबाद येथील वुडरीज शाळेत असाच प्रवेश देण्यात आल्याची तक्रार आरटीई पालक संघाचे अध्यक्ष प्रशांत साठे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हाधिकारी, मनपा शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ई-मेलद्वारे केली आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मात्र याबाबत सकदेव यांनी अजून पर्यंत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
या निवेदनात म्हटले आहे, गटशिक्षण अधिकारी पदावर असताना देखील सकदेव यांच्या मुलाचा १९ जुलै रोजी आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश कसा काय देण्यात आला? त्यांनी प्रवेशासाठी सादर केलेली कागदपत्रे कधी तयार केली आहेत हे तपासणे आवश्यक आहे. आरटीई मधून प्रवेश घेणाऱ्या पालकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड सक्तीचे करावे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकेल असेही या निवेदनात साठे यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आपले चिरंजीव यात्रा काढतात तेव्हा ती महाराष्ट्र घडवायला असते मात्र इतरांनी काढली की त्रास सुरू होतो का ?
- ‘सर्वसामान्य लोकांनी काय पाप केलंय? शिवसेना खासदार मागच्या दाराने सिद्धिविनायकाच्या दर्शनाला’
- ‘राज्यातील नेत्यांना हात जोडून विनंती करतो ओबीसींच्या हक्काचे हिरावू नका’
- शिवसेनेची ‘कावड यात्रा’ ; आ. दानवेंसह शिवसैनिकांवर गुन्हे दाखल!
- ‘बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर अजूनही..’, मनसेनी साधला सेनेवर निशाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

