Share

‘अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या चित्रा ताई यांच्याविरुद्ध उघड षडयंत्र होतंय’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पूजा चव्हाण या तरुणीचा पुण्यात मृत्यू झाला आहे. या गूढ मृत्यू प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. ठाकरे सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधकांचा स्पष्ट रोख आहे. संजय राठोड व पूजा चव्हाण या तरुणीचे संबंध असल्याचे काही फोटो व व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. सोशल मिडीयावर देखील संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सूर उमटतोय.

यामुळेच संजय राठोड यांचा पूजा चव्हाणच्या मृत्यूशी संबंध असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यात भाजप नेत्या चित्रा वाघ आघाडीवर आहेत. संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. पूजाच्या गूढ मृत्यू प्रकरणाचा पाठपुरावा चित्रा वाघ करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना धमक्यांचे फोन आले होते.

दरम्यान, लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने १२ फेब्रुवारी रोजी किशोर वाघ यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात चित्र वाघ या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी वन मंत्री संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी लावून धरलेली आहे. त्याचवेळी चित्रा वाघ यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहे.

दरम्यान, यामुळे भाजप नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतंय. भाजप नेते प्रसाद लाड यांनी यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘पळकुटे महाआघाडी सरकार! अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या चित्रा ताई यांच्याविरुद्ध उघड षडयंत्र होतंय. मी तर म्हणतो हे तर फक्त ‘चित्रातले वाघ’ आमच्याच खऱ्या ‘चित्रा ताई वाघ”, अशा आशयाचे ट्वीट करत प्रसाद लाड यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!