मुंबई : मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात स्वाक्षरी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येऊन सही केली.
राज्य सरकारने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यामुळे मनसेचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे नेत्यांना सीआरपीसी १४९ अंतर्गत नोटिस देखील पाठवण्यात आली आहे.
यावर भाष्य करताना ‘आम्ही मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम योग्य ती खबरदारी घेऊन पार पाडू. बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड नाही’, असा खोचक टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला लगावला आहे.
काय आहे संजय राठोड गर्दी प्रकरण
वनमंत्री संजय राठोड २३ फेब्रुवारी रोजी वाशिममधील पोहरादेवी गडावर गेले होते. पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. तेंव्हा कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले होते.
त्यामुळे संजय राठोड यांच्यावर कोरोना नियमभंगाची कारवाई केली जाणार का ? असा सवाल उपस्थित केला जात होता. ‘पूजा चव्हाण आत्महत्त्या प्रकरणावरून कारवाई झाली नाही. किमान कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तरी राठोड यांच्यावर कारवाई केली जावी’, अशी मागणी विरोधकांनी केली होती.
पोहरादेवी येथे कोरोना प्रतिबंधासाठी घालून देण्यात आलेले निर्बंध झुगारुन गर्दी जमल्याने सरकारवर टीकेची झोड उठवली गेली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आदेशाला वनमंत्री भिक घालत नसल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दीड वर्षानंतर अंगारकी चतुर्थीचा योग; मात्र, राजुरेश्वराचे मंदिर राहणार बंद
- जालन्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; १७१ नव्या बाधित रुग्णांची नोंद
- मराठा आरक्षण आंदोलनाचा ३९ वा दिवस; आता शिव संवादातून होणार आक्रोश मेळावा
- ‘तुम्ही नोकरी कसे करता तेच पाहतो’ म्हणून पोलिसांवर चाकुहल्ला; छावणीतील घटना
- …म्हणून पंत मला ‘वसिम भाई’ म्हणतो ; अक्षय पटेलने केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

