औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावामुळे चालु आर्थिक वर्षाचा निधी मिळण्यास अधीच उशीर झाला आहे. मिळालेला निधी मार्चआखेरपर्यंत खर्च केला नाही तर परत जाण्याची शक्यता आहे. यामुळे निधी खर्च करण्यासाठी कामे उरकण्याची लगबग सुरु आहे. पण तांत्रिक मान्यतेमुळे कामे रखडली गेली आहे. आगोदरचीच बीले रखडल्यामुळे शासनाची मान्यता मिळेल तोपर्यंत रस्त्याची कामे सुरु करा असे सांगूनही कंत्राटदारही कामे करण्यास तयार नाहीत.
तब्बल तीन महिने शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर आलेला निधी तांत्रिक मान्यतेमुळे कामे सुरु करण्यास आडथळा येत आहे. बांधकाम विभागानुसार शासनाने पुर्व व पश्चिम विभागातील कामाला हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यात पश्चिम विभागाने गुरुवारी २३ कामासाठी निवीदा काढल्या आहे, मात्र उर्वरीत कामांची निवीदा प्रक्रिया ही तांत्रिक कचाट्यात अडकली असल्याने निधी असुनही कामे रखडली आहेत.
दरम्यान दोन्ही विभागाच्या कामाला शासनाची परवानगी मिळेल तेव्हा तुम्ही कामे सुरु करा असे कंत्राटदारांना सांगण्यात आले पण अगोदरचीच बीले थकल्यामुळे कत्रांटदार कामे सुरू करण्यास तयार नाही. महत्वाची बाब म्हणजे आलेला निधी मार्चआखेरपर्यंत खर्च करणे गरजेचे आहे. त्यानंतर लगेच बीले शासनाकडे पाठवली जातील. पण या घाईगडबडीत कामाचा दर्जाकडे प्रशासन लक्ष देईल का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेकडून बीडची पालिका ‘टार्गेट’, नगराध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
- संजय राठोड यांच्यावर मुख्यमंत्री खरच नाराज आहेत की त्या फक्त पेरलेल्या बातम्या होत्या ?
- खरी लाज वनमंत्री संजय राठोड याला वाटली पाहिजे; रुपाली ठोंबरे यांची विखारी टीका
- आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्याकडून सायकल चालवत इंधन दरवाढीचा निषेध
- जगभरातील ७०० पेक्षा जास्त स्पर्धकांत औरंगाबादच्या वर्षा जोशी प्रथम; ठरल्या सर्वोत्कृष्ट गायिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
