अयोध्या : एमआयएम प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवैसी हे तीन दिवसीय उत्तरप्रदेश दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी अयोध्येत पत्रकार परिषद घेत समाजवादी पार्टीला लक्ष्य केले. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, मुस्लिमांचा विकास व्हावा असे कुठल्याच पक्षाला वाटत नाही. आपल्या देशात धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुस्लिम समाजाला फसवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने मुस्लिमांचा वापर केला अशी टीका ओवैसी यांनी केली. अखिलेश यादव यांनी मुस्लिम समाजामध्ये भिती निर्माण केली आणि सर्व राजकीय पक्षांनी मुस्लिम आणि दलितांचे शोषण केले आहे, आमचा पक्ष त्यांच्या विकासासाठी झटेल असेही ओवैसी म्हणाले.
अखिलेश यादव यांनी स्वतःचे सरकार असताना योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात खटला चालविला असता तर योगींना काहीच करता आले नसते हे सत्य आहे. पण मुस्लिमांचा विकास व्हावा असे कुणालाच वाटत नाही. देशातील १९ टक्के मुस्लिमांनी त्यांची गुलामी करावी, पण भागीदारी मागू नये असे राजकीय पक्षांना वाटत असल्याचा आरोप ओवैसी यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये २०२२ मध्ये निवडणूक होणार आहेत. त्यासाठी ओवैसी यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. उत्तरप्रदेशात सुमारे १९ टक्के मुस्लीम मतदार आहेत. ओवैसी यांच्या एआयएमआयएमने राज्यातील ४०३ पैकी १०० मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. मुस्लीम, यादव आणि ओबीसींमधील अन्य जातींच्या सोशल इंजिनियरिंगच्या मदतीने अखिलेश यंदा विजयाची आस बाळगून आहेत. पण मुस्लिमांची मते विभागली गेल्यास समाजवादी पक्षाला फटका बसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुंबई महापालिकेच्या शाळेत केंब्रिज बोर्ड सुरू होणार’, आदित्य ठाकरेंची घोषणा
- मुख्यमंत्र्यांचे ‘खास’ नार्वेकर यांचा बंगला तोडला, आता परब आणि सरनाईक यांचा नंबर – सोमय्या
- पुरुषप्रधान संस्कृती मागे टाकत ५ मुलींनी आपल्या आईच्या पार्थिवाला दिला खांदा
- ‘न सांगताही नांदेडमध्ये हजारो लोक जमा झाले, सांगून बघू का?’ मग बघा!
- माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली आहे, त्यामुळे ते भाई लोकांची मदत घेत आहेत – सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
