Share

फेसबुकवर दुचाकी विक्रीची जाहिरात देऊन युवकाची फसवणूक, भामट्याविरूध्द गुन्हा दाखल

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : फेसबुकवर जुनी दुचाकी विक्रीची जाहिरात पाहिल्यावर खरेदी करण्यासाठी पंजाबसिंग दिवाकरसिंग (वय ३१, रा. न्यू एसटी कॉलनी, सिडको, एन-२) या तरुणाने भामट्याशी संपर्क साधण्यात आला. तरुणाशी संपर्क होता भामट्याने त्याला व्हाटसअपवर फोटो व दुचाकी पाठविण्याचे आमिष दाखवून तरुणाला चाळीस हजारांचा गंडा घातला. हा प्रकार २२ डिसेंबर २०२० रोजी एन-२, सिडको भागात घडला.

पंजाबसिंग याने २२ डिसेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास मोबाइलच्या फेसबुकवर जुनी दुचाकी क्रमांक (एमएच-०३-डीबी-७८८०) विक्री असल्याची जाहिरात पाहिली होती. पंजाबसिंग यांनी दुचाकी खरेदी करण्यासाठी भामट्याशी संपर्क साधला असता २१ हजारात दुचाकी विक्री करण्याचा व्यवहार झाला होता.

त्यानंतर भामट्याने वेळोवेळी करून पंजाबसिंग यांच्याकडून ४० हजार रूपये उकळले. परंतु भामट्याने दुचाकी न पाठविल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पंजाबसिंग दिवाकरसिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात भामट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!