Share

चहलने केला जिमचा व्हिडीओ शेअर, ‘या’ क्रिकेटरने दिली सलमान खानची उपमा

Published On: 

मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. आगामी सप्टेंबर महिन्यापर्यंत भारतीय संघ इंग्लंडमध्येच असणार आहे. इंग्लंड दौऱ्याचा भाग नसलेल्या भारतीय खेळाडुंचा दुसरा संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व हे शिखर धवन करणार आहे.

मर्यादित षटकांची ही मालिका १३ जुलैपासुन सुरु होउन २५ जुलै पर्यंत चालणार आहे. यात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १३ जुलै, दुसरा १६ आणि तिसरा सामना १८ जुलै रोजी होणार आहे. तर टी-२० मालिकेतील पहिला सामना २१ जुलै, दुसरा २३ जुलै आणि अंतिम सामना २५ जुलै रोजी खेळवीण्यात येणार आहे.

शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ मुंबईत 14 ते 28 जूनदरम्यान क्वारंटाईन राहणार आहे. दौऱ्याआधी संघातील खेळाडू जोरदार कसरत करताना दिसत आहेत. नुकताच युजवेंद्र चहलचा कसरत करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये चहल जोरदार मेहनत करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताच त्याच्या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडला यातच त्याच्या या व्हिडिओवर  इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू साजिद महमूद याने एक जबरदस्त कमेंट केली आहे. या कमेंटला चहलने देखील जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे.

या व्हिडिओवर साजिदने कमेंट केली की, “लवकरच सलमान खान होशील.” प्रत्युत्तर देत चाहलने लिहिले , “आर्नोल्ड श्वार्जनेगर बद्दल काय विचार आहे.” तुम्हाला माहिती असेलच की, आर्नोल्ड हा एक महान बॉडी बिल्डर आहे.

https://www.instagram.com/reel/CQdOOpPHr6v/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!