Share

डब्ल्युटीसी फायनल! जेतेपद गमावले, मात्र अश्विनने रचला इतिहास

Published On: 

मुंबई : संपुर्ण देशाचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले. चौथ्या डावात भारताने दिलेले १३९ धावांचे लक्ष्य न्युझीलंडने ८ गडी राखुन सहज पार केले. ७ गडी बाद करणाऱ्या न्युझीलंडचा गोलंदाज कायली जेमीसनला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

पहिलीवहिली जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकत इतिहास घडवला. भारताने सामना गमावुनही आर आश्विनने या स्पर्धेत आर अश्विन हा सर्वाधीक गडी बाद करणारा फलंदाज ठरला. डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात २ गडी बाद करत त्याने हा विक्रम रचला. आर अश्विनने या स्पर्धेत तब्बल ७१ गडी बाद केले होते. या सामन्यापुर्वी पॅट कमिन्सच्या नावे ७० आणि स्टुअर्ट ब्रॉड ६९ बळी होते. अंतिम सामन्यात अश्विनने दोन गडी बाद करत इतिहास रचला.

अश्विनने २६ डावात ही किमया साधली आहे. तर पॅट कमिन्सने ७० गडी बाद करण्यासाठी २८ डाव घेतले होते. न्युझीलंडच्या चौथ्या डावात अश्विन एकमेव गोलंदाज होता ज्याला गडी बाद करण्यात यश आले. त्याने न्युझीलंडचे दोन्ही सलामीवीर टॉम लँथम आणि डेवॉन कॉनवे यांना बाद केले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!