Share

डब्ल्युटीसी फायनल! ‘गड गेला पण सिंह आला’ जडेजाची कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

Published On: 

मुंबई : संपुर्ण देशाचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले. चौथ्या डावात भारताने दिलेले १३९ धावांचे लक्ष्य न्युझीलंडने ८ गडी राखुन सहज पार केले. ७ गडी बाद करणाऱ्या न्युझीलंडचा गोलंदाज कायली जेमीसनला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा जरी पराभव झाला तरी टीम इंडियासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. आयसीसीने नुकतीच अष्टपैलु खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यात भारताचा अष्टपैलु रविंद्र जडेजाने पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. जडेजाने वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार जेसन होल्डरला मागे टाकत अव्वलस्थानी झेप घेतली आहे. दुसऱ्या स्थानी असलेल्या होल्डरच्या नावे ३८४ गुण आहेत.

या यादीत तिसऱ्या स्थानी इंग्लंडचा अष्टपैलु खेळाडू बेन स्टोक्स हा आहे. त्याच्या नावे ३७७ गुण आहे. तर चौथ्या स्थानी आर अश्विन ३५३ गुणासह विराजमान आहे. आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी येण्याची जडेजाची ही दुसरी वेळ आहे. यापुर्वी तो २०१७ साली ऑगस्ट मध्ये कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली होती. तर गोलंदाजीच्या क्रमवारीत पॅट कमिन्स हा अव्वल स्थानी असुन आर अश्विन हा दुसऱ्या स्थानी असुन पहिल्या दहा मध्ये असलेला तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!