Share

सिल्लोडच्या ताफ्यात येणार चार अत्याधुनिक रुग्णवाहिका, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचा पुढाकार!

Published On: 

सिल्लोड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागात तर रुग्णवाहिकांना विशेष महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या स्थानिक निधीतून सिल्लोड तालुक्यासाठी चार अत्याधुनिक पद्धतीच्या रुग्णवाहिका दिल्या आहेत. बुधवारी ( दि.१९ ) जिल्हाधिकारी यांनी याबाबत प्रशासकीय मान्यता देत निधी वितरणाचे आदेश जारी केले आहेत.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या स्थानिक निधीतून तालुक्यातील पालोद, उंडणगाव, अंधारी व शिवना या चार प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रत्येकी एक रुग्णवाहिका देण्यात आली असून लवकरच सदरील प्राथमिक आरोग्य केंद्रास अत्याधुनिक पद्धतीच्या रुग्णवाहिका रुग्णाच्या सेवेत दाखल होणार आहेत. कोरोनाचे संकट पाहता मतदार संघात जास्तीत जास्त आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. मतदार संघात पहिल्या टप्यात ४ रुग्णवाहिका देण्यात आल्या असून सोयगाव तालुक्यासाठी तसेच सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालय व सिल्लोड तालुक्यातील उर्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आलेला आहे.

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यातील नादुरुस्त रुग्णवाहिकेचा विषय मांडत कोरोनाची सद्यस्थिती तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करीत असताना जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रास अत्याधुनिक रुग्णवाहिका देण्याबाबत पालकमंत्री देसाई यांच्याशी चर्चा केली. यावर पालकमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही दिली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!