औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. पारस मंडलेचा हे बुधवारी (दि.१९) रुजू झाले. शासनाने डॉ. मंडलेचा यांची बीड येथून प्रतिनियुक्तीवर मनपा मध्ये बदली केली आहे. दोन वर्षांपासून डॉ. नीता पाडळकर यांच्याकडे प्रभारी स्वरूपात हा पदभार होता. महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी हे पद प्रशासनाकडून भरले जाते. या पदावर शासनाकडून दोन वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर अधिकारी नियुक्त केले जातात. मात्र गेल्या २ वर्षांपासून शहराला या पदावर अधिकारी देण्यात शासनाने दुर्लक्ष केले होते.
या आधी शासनाचे अधिकारी डॉ. सुहास जगताप यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी शासनाने नवीन अधिकारी दिला नव्हता. त्यामुळे दोन वर्षांपासून महापालिकेतच डॉ. नीता पाडळकर यांच्याकडे या पदाचा प्रभारी पदभार सोपविण्यात आला होता. मागील वर्षभरापासून डॉ पाडळकर यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभाग कोरोना नियंत्रणासाठी काम करत आहे. सध्या रुग्णसंख्या आटोक्यात असून कोरोनाची दुसरी लाट ओसरली असे म्हणण्यास हरकत नाही.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी मिळावा अशी मागणी महापालिकेचे प्रशासक अास्तिक कुमार पांडेय यांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार आता शासनाने बीड जिल्हा रुग्णालयातील बधिरीकरण तज्ञ डॉ. पारस मंडलेचा यांची प्रतिनियुक्तीवर महापालिकेत बदली केली आहे. बदलीचे आदेश निघाल्यानंतर आठ दिवसांनी मंडलेचा बुधवारी महापालिकेत आले. सुरुवातीचे काही दिवस ते काम समजून घेतील तोपर्यंत डॉ. पाडळकरच कारभार सांभाळणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदी कशाचीही जबाबदारी घेत नाहीत’, भाजप खासदाराचा घरचा आहेर
- मोठी बातमी! केंद्राकडून ‘म्युकरमायकोसिस’चा साथरोग कायद्यात समावेश, नवीन नियम लागू
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंचा दौरा म्हणजे लिपस्टिक दौरा’, नितेश राणेंची टीका
- ‘आम्हाला बोलू दिले नाही तर मग बोलवलं कशाला?’, ममता पंतप्रधान मोदींवर भडकल्या
- औरंगाबादेत दुसरी लाट ओसरल्यावर काँग्रेसने सुरु केले क्वारंटाईन सेंटर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
