Share

चिंताजनक ! साध्या पाण्यामुळे म्युकरमायकोसिस, आता ‘डिस्टील वॉटर’ वापरण्याच्या मनपाच्या सूचना !

Published On: 

औरंगाबाद : कोरोना रुग्णांवर उपचार करताना खासगी रुग्णालयांत व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनच्या बाटल्यांमध्ये डिस्टील वॉटर ऐवजी साधे पाणी वापरले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच कोरोना रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत रुग्णालयांनी तातडीने व्हेंटिलेटर व ऑक्सिजनच्या बाटल्या स्वच्छ करुन त्यामध्ये डिस्टील वॉटरच वापरावे, अशी स्पष्ट ताकीद खासगी व सरकारी रुग्णालयांना पत्राद्वारे दिली आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

पालिकेला खासगी रुग्णालयांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरात आजवर म्युकरमायकोसिसचे आजाराचे २०१ रुग्ण दाखल झाले आहेत. यापैकी १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये स्टेरॉइडचे १४८ तर ऑक्सिजनची कमतरता असलेले ११० रुग्ण आहेत. म्युकरमायकोसिसचा आजार कशामुळे होऊ शकतो, याबद्दल आरोग्य विभागाने काढलेल्या निष्कर्षांमध्ये एक प्रमुख कारण म्हणजे सरकारी आणि खासगी रुग्णालयांत कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन आणि व्हेटिंलेटरच्या बाटलीमध्ये डिस्टील वॉटर वापरले जात नाही.

तर त्याजागी साधे पाणी वापरण्यात येत असल्याचे समोर आले आहे. साध्या पाण्यामुळे काळी बुरशी लवकर होते. त्यामुळे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या बाटल्यामध्ये डिस्टील वॉटरच वापरण्याची सक्त सूचना शासनाने केली आहे. त्यानुसार पालिकेने तातडीने मंगळवारी पत्र काढून शहरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयाना पाठवले आहे. पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांमध्ये फंगल इंन्फेशन होत असल्याचे आढळून आले आहे. कोरोनावर उपचार घेताना रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा वापर करताना त्याच्या बाटल्यामध्ये साधे पाणी वापरले जात असल्याने काळी बुरशी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मेल्ट्रॉन कोविड सेंटरमधील ऑक्सिजनच्या बाटल्या स्वच्छ करुन त्यामध्ये डिस्टील वॉटरचा वापर केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!