Share

औरंगाबादेत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी शहर काँग्रेसची ‘विशेष’ कमिटी!

Published On: 

औरंगाबाद : शहरासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात उभारण्यात यावा यासाठी शहर काँग्रेसद्वारे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. नुकतीच मंगळवारी (दि.१८) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री व पदाधिकारी यांची एक बैठक संपन्न झाली. यात लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा औरंगाबाद येथे असावा याबाबत बैठकीमध्ये ठराव मंजूर करण्यात आला. औरंगाबाद शहर काँग्रेस कमिटीने यासाठी एक समिती स्थापन केली असून यात शहरातील माजी मंत्री, आमदार, जेष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

मराठवाड्याच्या विकासाला चालना देण्यासाठी विशेषत: औरंगाबाद शहरातील विविध विकासात्मक कामे करण्यासाठी विलासराव देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे या शहरावर प्रेम असलेले नेते व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा एक पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती पुतळ्यासाठी प्रशासनाकडे जागेची मागणी करणे, जागा मिळाल्यानंतर त्वरित पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न करणे व येणाऱ्या काळात विविध स्वरूपाने पुतळा उभारण्यासाठी कामे हाती घेणार आहेत.

या समितीचे अध्यक्ष माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार उपाध्यक्ष केशव अवताडे, सरचिटणीस प्रकाश मुगदिया, शहराध्यक्ष कोषाध्यक्ष मोहम्मद हीशाम उस्मानी, तसेच उत्तम सिंग पवार, कल्याण काळे, नामदेव पवार, सुभाष झांबड यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीतर्फे मा विलासरावजी देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणे, स्मारकासाठी जागेची मागणी करणे याबाबतीत पाठपुरावा करण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!