Share

‘तिसऱ्या लाटेत बालकांसाठी कोरोनापेक्षा पोस्ट कोविडच अधिक धोकादायक, पालकांनी काळजी घ्या’

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांना तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. या लाटेत बालकांना कोरोना होऊन बरे झाल्यानंतर होणारा पोस्ट कोविडचा धोका जास्त असल्याचे बाल रोग तज्ञ यांचे मत आहे. या पोस्ट कोविडपासून बालकांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने सर्वतोपरी तयारी सुरू केली आहे. ही तिसरी लाट रोखण्यास औरंगाबाद महानगरपालिका यशस्वी होईल असा विश्वास महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केला.

यावेळी बोलतांना पांडेय म्हणाले, कोरोना संदर्भात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महानगरपालिका प्रशासन , लोकप्रतिनिधींच्या व नागरिकांच्या सहकार्यामुळे यशस्वी झाले आहे. दरम्यान तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असून या कोरोनाच्या लाटेत बालकांना कोरोनापेक्षा पोस्ट कोविडचा जास्त धोका असल्याचे बालरोग तज्ञांचे म्हणणे आहे. कोरोना बरा झाल्यानंतर निगेटिव्ह इम्पॅक्ट दीड ते दोन महिने बालकाच्या शरीरावर राहू शकतो याची नागरिकांनी काळजी घ्यावी. या पोस्ट कोविडपासून बालकांना गंभीर त्रास होणार नाही यासाठी महानगरपालिका विविध उपाययोजना आखत आहे.

प्रशासनाने त्यादृष्टीने तीन स्तरावर तयारी सुरू केली आहे. यासाठी शहरातील सर्व बालरोग तज्ज्ञाची बैठक घेण्यात आली आहे. यादृष्टीने मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर उभा करणे, एमजीएम मधील स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे लहान मुलांसाठी १०० बेडचे कोविड केअर सेंटर, गरवारे कंपनी मध्ये १०० बेडचे बाल कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

मेडिसीन व टेस्टिंग ची तयारी करण्यात येत आहे. तिसर्‍या लाटेत बालकांना सुरक्षित ठेवण्यात महानगरपालिका प्रशासन यशस्वी होईल. याचबरोबर लसीकरणाचा वेग जर वाढला तर तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल परंतु १०० टक्के व्हॅक्सिनेशन होत नाही तोपर्यंत गाफील राहून चालणार नाही. प्रत्येकाने मास्क वापरावा, त्रिसूत्रीचे पालन करावे असेही आयुक्तांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!