Share

पोलीस भरतीबाबत लवकरच निर्णय जाहीर करू : गृहमंत्री वळसे-पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया अनेक महिन्यांपासून रखडली आहे. २०१८ मध्ये प्रतिक्षा यादीत असलेल्या उमेदवारांनाही अद्यापपर्यंत नियुक्ती मिळालेली नाही. मराठा आरक्षण न्यायालयात अडकल्यामुळे राज्य सरकारच्या वतीने होणाऱ्या भरती प्रक्रिया थांबवण्यात आल्या होत्या. यात काही विद्यार्थ्यांनी लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली होती, तर काही विद्यार्थी मराठा आरक्षणाचा निकाल लागू द्यावा, या मताचे होते. मात्र, या सर्वात अनेक विद्यार्थी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्रतिक्षा करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, ‘पदोन्नतीचा विषय मार्गी लावला आहे. आता पोलीस भरतीबाबत आम्ही काम करतोय. याबाबतही लवकरच निर्णय जाहीर करु, असं वळसे-पाटील म्हणाले आहेत.

त्याचबरोबर तोत्के चक्रीवादळात गुजरातसह कोकणालाही मोठा फटका बसलाय. पंतप्रधान मोदी यांनी गुजरातला 1 हजार कोटीच्या मदतीची घोषणा केली आहे. पण महाराष्ट्रासाठी मदत जाहीर केली नाही. त्यावर बोलताना वळसे-पाटील म्हणाले की, केंद्राने गुजरातला मदत केली याबद्दल तक्रार असण्याचे काही कारण नाही. मात्र, त्यासोबत महाराष्ट्रालाही मदत मिळायला हवी असे ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!