Share

किरकोळ कारणावरून भंगारविक्रेत्यासह चौघांना बेदम मारहाण

Published On: 

औरंंगाबाद : वाळूज परिसरातील पंढरपूर येथील भंगारविक्रेते सय्यद जब्बार व नातेवाइकांना किरकोळ कारणावरून मारहाण करणाऱ्या शेख मुसा शेख गुड्डू, शेख नदीम, शेख ताहेर, शेख राजू, सलाउद्दीन व शेख जुबेर (सर्व रा. पंढरपूर) यांच्याविरोधात वाळूज एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१३ मे रोजी सय्यद जब्बार यांचे ड्रायव्हर अलीम शेखने भंगारच्या दुकानासमोर वाहन उभे केले होते. या वेळी शेख मुसाने येथे गाडी का लावली, याचा जाब विचारत वाद घालण्यास सुरुवात केली होती. हा वाद सुरू असताना जब्बार तेथे आले. त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त झालेल्या चौघा आरोपींनी घरातून कमरेचा पट्टा, लोखंडी रॉड व काठी घेऊन जब्बार यांच्यावर हल्ला केला.

शेख मुसा याने दगड, तर शेख राजू याने लोखंडी रॉडने जब्बार यांच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. भांडणाचा आवाज ऐकून जब्बार यांचा मोठा भाऊ पप्पू, आई नसिमाबी, वडील सय्यद गफ्फार मदतीसाठी आले असता शेख मुसा व त्यांच्या कुटुंबातील शेख जब्बो, शेख शाहिन यांनी जब्बार यांच्या आई-वडील व भावास बेदम मारहाण केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!