Share

सौभाग्याचे लेणे तब्बल २२ वर्षांनी परत मिळाले

Published On: 

उस्मानाबाद : चोरीला गेलेला ऐवज एक वर्ष किंवा दोन वर्षात परत मिळाला असं आपलं ऐकलं असाल. पण उस्मानाबाद येथील शकुंतला ताई यांची गोष्ट काही वेगळीच आहे. तब्बल २२ वर्षांअगोदर चोरीला गेलेले अडीचग्रामचे मंगळसूत्र २ मार्च २०२१ उजाडल्यावर त्यांना परत मिळाले आहे. तब्बल २२ वर्ष त्यांनी या घटनेचा पाठपुरावा केला. शेवटी त्यांना आपले मंगळसूत्र मिळवण्यात यश आले.

२२ वर्षांअगोदर म्हणजे शकुंतला जेव्हा चाळीशीत होत्या, तेव्हा त्यांनी मजुरी करून एक एक रुपया जोडत ९०० रुपये जमा करून त्यांनी अडीच ग्राम सोन्याचे मंगळसूत्र घेतले. शंकुतला बाई येरमाळ्याच्या यात्रेसाठी १९९८ साली गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचे मंगलसूत्र चोरट्याने लंपास केले. त्यावेळी त्यांनी येरमाळा पोलीस चौकीत आपली तक्रार नोंदवली होती.

तत्कालीन कर्मचाऱ्यांनी वर्षभरातच गुन्ह्याचा छडा लावला होता. मंगळसूत्रासह चोरट्यांना गजाआडही केले. पुढे पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. मात्र न्यायालयीन प्रक्रियेतच हे मंगळसूत्र अडकून पडले. शेवटी हे मंगळसूत्र शकुंतला बाईंना २ मार्चला मिळाले. विशेष म्हणजे १९९८ साली चोरी झाली तेव्हा येरमाळ्यात पोलिस चौकी होती. आज सुसज्ज पोलिस स्टेशन आहे.

११९८ ला चोरीला गेलेले मंगळसूत्राचे प्रकरण १३ जुलैला २०१९ ला न्यायालयीन सुनावणीला आले. त्यानंतर कळंब न्यायालयात लोक अदालत झाली. त्यात हे प्रकरण पटलावर आले. अन शेवटी शकुंतला बाईला मंगळसूत्र परत मिळाले. यावेळी त्यांना वकिलाला ५०० रुपये इतकी रक्कम अदा करावी लागली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!