औरंगाबाद : डिस्चार्ज देण्याच्या बहाण्याने रात्री दोन वाजता कोरोनाबाधित महिलेला केबिनमध्ये बोलावून घेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टराला महापालिकेने गुरुवारी (दि.४) तडकाफडकी बडतर्फ केले आहे. तसेच महापालिकेचा ‘तो’ डॉक्टर पंजरकर व संबंधित महिला एकमेकांच्या ओळखीचे असून दोघांनी डॉक्टरच्या केबिनमध्ये ४० मिनिटे गप्पा मारल्याचे सीसीटीव्हीमधून समोर आहे, असे मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. दरम्यान महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी देखील यासंदर्भात माहिती दिली आहे.
महापालिकेच्या पद्मपुरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये मंगळवारी (ता. दोन) रात्री हा प्रकार घडला होता. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर महापालिकेने कंत्राटी डॉक्टरांची नेमणूक केली आहे. सचिन पंजरकर याची गतवर्षी मे महिन्यात नेमणूक केली होती.
तो पदमपुरा येथे कार्यरत होता. दरम्यान २३ फेब्रुवारी महिला पदमपुरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये २५ वर्षीय महिला दाखल झाली होती. तिला पाच मार्चला डिस्जार्ज दिला जाणार होता. मात्र ही महिला डिस्चार्जची मागणी करत होती. त्यामुले पंजरकर याने रात्री दोन वाजता महिलेला मोबाईलवरून संपर्क साधत तुम्हांला डिस्चार्ज द्यायचा आहे, केबिनमध्ये या असे सांगितले. यावेळी पंजरकर यांनी आपल्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महिलेने महापालिका प्रशासनाकडे केली होती.
त्यानुसार प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी चौकशीचे आदेश दिले होते. रात्री उशिरापर्यंत प्रकरणाची चौकशी करून अहवाल प्रशासकांना सादर करण्यात आला. त्यांनी पंजरकर याला बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत.
विधिमंडळापर्यंत गेले प्रकरण
महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित डॉक्टराला महापालिका प्रशासनाने निलंबित केल्याचे उत्तर दिले.
डॉक्टर होता लग्नासाठी सुटीवर
डॉ. पंजरकर हा स्वतःच्या लग्नासाठी महिनाभर सुटीवर होता. दोन दिवसांपूर्वीच तो रुजू झाला होता. त्यानंतर हा प्रकार घडला आहे. दरम्यान मंगळवारी रात्री महिलेच्या नातेवाइकांनी कोविड केअर सेंटरमध्ये धाव घेत पंजरकर याला बेदम चोप दिला होता. महिलेने बदनामी होईल, म्हणून पोलिस ठाण्यात तक्रार दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सत्ताधाऱ्यांना पाच, आम्हाला फक्त एक कोटी! ऐसा कैसा चलेगा?’
- ‘या’ घटनांमुळे शहरात वाढली दबंगाई
- उन्हाळ्यापूर्वीच सिडको-हडकोत पाण्याचा ठणठणाट
- मास्क न घालणाऱ्या ‘या’ गटामुळेच शहरात वाढले कोरोना रुग्ण
- ..आणि धस म्हणाले, ‘धनंजय यांचे ‘ते’ प्रकरण मला पहिल्यापासून माहितेय!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

