Share

‘या’ घटनांमुळे शहरात वाढली दबंगाई

Published On: 

औरंंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकाकडून रेल्वेस्टेशनकडे जात असलेल्या कारला रिक्षाने पाठीमागून धडक दिल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास बाबा पेट्रोल पंप चौकातील उड्डाणपुलाजवळ घडली होती. याप्रकरणी कारचालक मंगेश नारायणराव देशपांडे (वय ६२, रा.श्रध्दा रेसीडेन्सी, समर्थनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून रिक्षा क्रमांक (एमएच-२०-डीसी-२२१८) चा चालक मुक्तार ताहेरखान पठाण, (रा.पिरबाजार) याच्याविरूध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत रिक्षामध्ये सहप्रवासी म्हणून बसलेल्या चोरट्याने अंकूश गंगाराम धनेधर (वय ४०, रा.फुलेनगर, उस्मानपुरा) यांचा ६ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. ही घटना १ मार्च रोजी कंदी हॉस्टेल ते चौसर चौक दरम्यान घडली. याप्रकरणी मोबाईल चोरट्याविरूध्द उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या घटनेत नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेराहुन पाच लाख रूपये आण असे म्हणत तक्रारदार विवाहितेच्या पतीसह तीन जणांनी छळ केला. हा प्रकार ११ मे २०१८ ते एप्रिल २०१९ या काळात घडला. तक्रारदार विवाहितेच्या तक्रारीवरून पती साफरान अहमद याच्यासह सासू आणि नंणदेविरूध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौथ्या घटनेत शरणापूर परिसरातील गट क्रमांक ५० येथे असलेल्या मोबाईल टॉवरच्या १७ हजार ६०० रूपये विंâमतीच्या २२ बॅट-या चोरट्याने चोरून नेल्या. चोरट्याने बॅट-या चोरून नेल्याची घटना १६ फेब्रुवारी ते १ मार्च २०२१ या काळात घडली. याप्रकरणी योगेश उखाजी इंगळे (वय ३२, रा.गोळेगाव, ता.सिल्लोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचव्या घटनेत अवैधरित्या विनापरवाना देशी दारूची विक्री करणा-या रामेश्वर राघुजी गवई (वय ४५, रा.जोगेश्वरी झोपडपट्टी) याला पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई २ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास जोगेश्वरी परिसरात करण्यात आली. रामेश्वर गवई याच्या ताब्यातून पोलिसांनी ९३६ रूपये विंâमतीच्या १८ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाव्या घटनेत दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एकाने विकास अशोक गोखले (वय ३१, रा.संसारनगर) याच्या डोक्यात दारूची बॉटल मारून डोके फोडले. ही घटना १ मार्चला सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास देवगिरी हारूवूâलजवळ घडली. याप्रकरणी विकास गोखले याने दिलेल्या तक्रारीवरून सतीश अण्णाराव हिवराळे (रा.समतानगर) याच्याविरूध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातव्या घटनेत  कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शहरात रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्रीची संचारबंदी सुरू असतांना मध्यवर्ती बसस्थानकासमोरील न्यु युनुस टी हाऊस सुरू ठेवणा-या युनुस अहेमद निसार अहेमद (वय ४६,रा.बारापुल्लागेटजवळ, मिलकॉर्नर) आणि बाबा पेट्रोलपंप चौकातील आशियाना हॉटेल सुरू ठेवणा-या मोहम्मद जुनेद मोहम्मद युसूफ (वय २८, रा.सादातनगर, रेल्वेस्टेशन परिसर) यांच्याविरूध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आठव्या घटनेत चाकूचा धाक दाखवत एकाने खेळणी विक्रेत्यास मारहाण करून त्याच्याजवळील १ हजार ३०० रूपये हिसकावून नेले. ही घटना २ मार्चला रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास नंदनवन कॉलनी परिसरातील माऊली चौकात घडली. याप्रकरणी सिमोन शेषराव पाटोळे (वय ४०, रा.भुजबळनगर, न्यु नंदनवन कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून लुटमारी करणा-या सोन्या नावाच्या युवकाविरूध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवव्या घटनेत एमआयडीसी वाळूज परिसरातील जोेगेश्वरी येथील रहिवासी राजेंद्र लक्ष्मणराव नवतुरे (वय ३९) यांना दोन जणांनी घरात घुसून चाकूने मारहाण केली. ही घटना २ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. घरात घुसलेल्या दोघांनी राजेंद्र नवतुरे यांना तु विशाल संदीपराव सुर्यवंशी यांच्याविरूध्द पोलिसात तक्रार का दिली म्हणून मारहाण केली. तसेच आमच्याविरूध्द तक्रार दिल्यास जीवे मारून टाकू अशी धमकी दिली. याप्रकरणी मारहाण करणाNया दोघांविरूध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!