Share

पंजाबातील निकालांमुळे भाजपला धक्का; अमित शहांनी घेतली तातडीची बैठक

Published On: 

नवी दिल्ली :  केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचं गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचे पडसाद आता निवडणुकांमध्ये उमटायला सुरु झाले आहेत. विरोधकांनी शेतकरी आंदोलनाला विरोधकांनी सशर्त पाठिंबा दिला आहे. यात कॉंग्रेस अग्रेसर आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी शेतकरी एक इंचही मागे हटणार नाहीत, अशी तंबी दिली होती.

संसदेच्या अधिवेशनात देखील शेतकऱ्यांची बाजू मांडली होती. त्यामुळे पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी काँग्रेसला कौल दिल्याचे दिसतंय. पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ होऊन काँग्रेसला दणदणीत यश मिळाल्यामुळे भाजपच्या गोटात घबराट उडाली आहे. या निकालामुळे धास्तावलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज तातडीने वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावून पंजाबातील निकाल व शेतकरी आंदोलनाचा आढावा घेतला.

पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी रोजी ८ नगरपालिका, १०९ नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. विशेषतः भाजप खासदार सनी देओल यांच्या मतदारसंघात असलेल्या सर्वच्या सर्व जागांवर भाजप पराभव झाला आहे. तर २९ जागांवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.

पंजाबचे निकाल हाती येताच अमित शहा यांनी आज तातडीने बैठक बोलावली. या बैठकीला भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर, पश्चिम उत्तर प्रदेशमधले भाजप नेते व केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीव बालियान हे नेते उपस्थित होते. यावेळी तिन्ही कृषी कायदे हे शेतकऱयांचे कसे हिताचे आहेत हे पटवून सांगा.

खाप पंचायती व शेतकरी महापंचायतींच्या नेत्यांशी स्थानिक भाजप नेत्यांना संपर्क ठेवण्याच्या सूचना द्या असा आदेश शहा यांनी यावेळी दिला. काही मंडळी शेतकऱयांमध्ये जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करत आहेत. त्यापासून शेतकऱयांचे प्रबोधन करा अशा सूचनाही अमित शहा यांनी दिल्या. तसेच जाट बेल्टमधील आमदार, खासदारांकडून यावेळी शहा यांनी फीडबॅकही घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!