औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकार हे स्थगिती सरकार तर आहेत. तर सत्ताधारी पक्षाच्या अमदारांना पाच कोटीचा निधी देत आहे. तर आम्हाला म्हणजेच विरोधीपक्षातील आमदारांना मात्र फक्त १ कोटींचा विकास निधी देत असल्याची टीका लातूर जिल्ह्यातील औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आघाडी सरकारवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना टीका केली आहे.
या वेळी आमदार पवार म्हणाले की, माझ्या मतदार संघातील विकास कामांसाठी पुरेसा तसेच मागितलेला निधी मिळत नाही. हा अन्याय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारकडून होत असल्याचे देखिल निर्दशनास आणून दिले. माझ्या मतदार संघामध्ये उद्योजक उद्योग उभारण्यासाठी येत आहेत. परंतू औसा एमआयडीसीने जागा उपलब्ध करुन दिली तर उद्योग येथे येवू शकतील. तसेच स्थानिक सुशिक्षित बे – रोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध देखील होवू शकतो. परंतू सरकारची या बाबत निराशा दिसत आहे.
शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद झाली आहे.परंतू तोडलेली वीजेची जोडणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मात्र पुन्हा महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. कोणतेही डीपी जळाली तर बदलून देण्यासाठी तब्बल ६ ते ७ महिने लागतात. मग पाऊस चांगला पडून देखील काहीच उपयोग होत नाही. दरम्यान जळालेली डीपी शेतकरी स्वत: महावितरणच्या कार्यालयात घेवून जातात. मग महावितरण काय काम करते हा देखील प्रश्नाचे उत्तर सरकारने द्यावे, असेही या वेळी पवार यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- गब्बर सापडला, सरकारला गबरू कसा सापडत नाही?’
- लक्षवेधक! शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विधीमंडळात आंदोलन
- धनंजय मुंडेंना धक्का, ‘या’ ठिकाणी नमिता मुंदडा यांचे पुन्हा एकदा वर्चस्व
- एसटी अधिकाऱ्याला शिवीगाळ; ‘वंचित’च्या जिल्हाध्यक्षांना ठोकल्या बेड्या
- कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी‘एसओपी’ ला, अजित पवारांची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

