Share

“भारतीय संघाला…”; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवानंतर पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे मोठे वक्तव्य

Published On: 

केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा ७ गडी राखून पराभव केला आणि तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. २१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने चौथ्या दिवशी ३ गडी गमावून लक्ष्य गाठले आणि यासह मालिकाही आपल्या नावावर केली. सेंच्युरियन कसोटी सामन्यात पहिला सामना जिंकून भारतीय संघाने शानदार सुरुवात केली, मात्र दक्षिण आफ्रिकेने दोन्ही सामने जिंकून जबरदस्त पुन रागमन केले आणि भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिकेत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाच्या पराभवावर पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. सलमान बटने भारतीय संघाच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतीय संघाचा केवळ ५ फलंदाजांसह खेळण्याचा निर्णय योग्य नव्हता, कारण यापैकी २ फलंदाज फॉर्ममध्ये नव्हते, असे सलमानने म्हटले आहे.

भारतासारख्या बलाढ्य संघाला दक्षिण आफ्रिकेच्या अननुभवी संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागल्याने सलमान बटला धक्का बसला आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलवरील चर्चेदरम्यान तो म्हणाला, “भारतीय संघाला आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. फॉर्म आणि अनुभव दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत. दक्षिण आफ्रिकेत या फॉर्मात असलेल्या फलंदाजांऐवजी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संधी दिल्याचे आपण पाहिले. वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्यांवर तुम्ही फॉर्ममध्ये नसलेल्या अनुभवी खेळाडूंवर अवलंबून आहात. याशिवाय, तुम्ही फक्त ५ फलंदाजांसोबत मैदानात उतरत आहात, त्यापैकी ३ फलंदाजांच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह आहेत.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!