Share

ठाकरेंवर चंद्रकांत पाटलांनी केलेल्या टीकेला जयंत पाटलांचे थेट उत्तर, म्हणाले…

Published On: 

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर भाजप नेते वारंवार टीका करत आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांची तब्येत अजूनही ठीक नसले तर पदभार दुसऱ्याकडे सोपवा, असा खोचक सल्ला देखील भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला आहे. त्यांच्या या टीकेवर आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी थेट उत्तर दिले आहे.

भाजप नेते चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले होते, संकटाच्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन काम करणे अपेक्षित आहे. त्यांच्या वतीने कोणी मुख्यमंत्री म्हणून काम करावे हे ठरविण्याचा त्यांचा अधिकार आहे. आपण मुख्यमंत्र्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. पण तब्येत बरी होईपर्यंत त्यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या त्या टीकेला प्रत्युत्तर देताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, मुळात मुख्यमंत्री ठाकरे हे कामावर रूजू झाले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ते बैठकांना हजर राहत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम कुठे अडले नाही, ते पूर्ण क्षमतेने काम करत आहे. आता पाटील अशी रोज रोज मागणी करत असेल तर मला त्यांच्याशी बोललं पाहिजे, ते रोज का बोलत आहेत, हे मला कळले पाहिजे, असा टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!