मुंबई: मुंबै बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांचे वर्चस्व संपुष्टात आले. तर अध्यक्षपद निवडणुकीत प्रसाद लाड (Prasad Lad) यांचा पराभव झाला. यावरच प्रतिक्रिया देताना ‘देवेंद्र फडणवीस हे आमचे कुटुंब प्रमुख, आमचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर नाराज होऊ शकत नाही. तसेच प्रवीण दरेकर आणि मी संताजी, धनाजीची जोडी महाराष्ट्राला मिळाली आहे. ‘ असे म्हटले. यावरूनच आता राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहे.
दरम्यान प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Pathil Thombre) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘स्वतःला संताजी-धनाजी म्हणून घेणाऱ्या प्रसाद लाड यांचे मुबंई बँकेत भाजपचा झालेल्या पराभवाने मानसिम संतुलन बिघडले आहे का? तुम्ही संताजी-धनाजी मग नेमके छत्रपती शिवाजी महाराज कोण?’ असा सवाल रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्वीट करत केला आहे. यासोबतच त्यांनी वाचळवीर आणि शिवद्रोहीभाजप असे हॅशटॅगही वापरले आहेत.
स्वतःला संताजी-धनाजी म्हणून घेणाऱ्या @PrasadLadInd याचे मुबंई बँकेत भाजपाने केलेल्या पराभवाने मानसिम संतुलन बिघडले आहे
का?तुम्ही संताजी धनाजी मग नेमके छत्रपती शिवाजी महाराज कोण ? #वाचळवीर #शिवद्रोहीभाजपा
— Rupali patil thombare (@Rupalispeak) January 15, 2022
काय म्हणाले होते प्रसाद लाड?
प्रवीण दरेकर आणि मी संताजी, धनाजीची जोडी महाराष्ट्राला मिळाली आहे. सरकारही या जोडीला घाबरतं. सरकारही आम्ही काय रिअॅक्शन करु याला घाबरते. त्यामुळे दरेकर यांच्यावर नाराजीचा प्रश्नच येत नाही. निवडणुकीत गद्दारी ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि महाविकास आघाडीनं केली आहे.मुंबई बँक निवडणूक दरेकर यांचा घात करुन निवडणूक ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. असा आरोप प्रसाद लाड यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या:
- “मराठी भाषा आणि संस्कृतीचे शत्रू आपल्याच घरात”, शिवसेनेने विरोधकांना सुनावले
- फडवणीस महाराष्ट्र सोडून गोव्यात व्यस्त मग विरोधीपक्षनेत्याचा चार्ज कुणाकडे द्यावा? रुपाली ठोंबरेंचा टोला
- “नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही…”, फडणवीसांची शरद पवारांवर टीका
- ‘…आताही तीच परिस्थिती शिवसेनेची होणार’; निवडणुकांवरून प्रविण दरेकरांचे वक्तव्यं
- मुंबईत ओमायक्रॉनची लाट? टास्क फोर्स म्हणते…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

