Share

‘मुख्यमंत्री महाराष्ट्राचे की मुंबईचे?’; अतुल भातखळकरांची ठाकरेंवर टीका

Published On: 

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची प्रकृती बरी नसल्याने ते काही दिवसांपासून बाहेर कुठे येत नाहीत. त्याच सोबत हिवाळी अधिवेशन झाले तेव्हा देखील मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. या बैठकीला देखील उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. त्यामुळे भाजप नेते मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत.

भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत म्हणलं होतं, संकटाच्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन काम करणे अपेक्षित आहे. त्यांच्या वतीने कोणी मुख्यमंत्री म्हणून काम करावे हे ठरविण्याचा त्यांचा अधिकार आहे. आपण मुख्यमंत्र्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. पण तब्येत बरी होईपर्यंत त्यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रकृतीच्या कारणामुळे देशाच्या पंतप्रधानांनी बोलाविलेल्या महत्वाच्या बैठकीला गुरूवारी दांडी मारणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महापालिकेच्या बैठकीला उपस्थित राहतात याबाबत आश्‍यर्य व्यक्त करून हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत की मुंबईचे असा प्रश्‍न भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!