Share

“…म्हणजे सांस्कृतिक दहशतवादाला बळी पडल्याचे लक्षण”,किरण मानेंच्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेमधील अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राजकीय भूमिका मांडल्याने त्यांना मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता अनेक राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. त्यामुळे एकप्रकारे या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. यावरच आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून किरण मानेंसारखा अभिनेता राजकीय विषयावर व्यक्त झाला म्हणून राजकीय दबावाला आणि ट्रोलिंगला बळी पडून स्टार प्रवाहने त्यांना काढून टाकणे म्हणजे सांस्कृतिक दहशतवादाला बळी पडल्याचे लक्षण आहे.’ असे ट्वीट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

नेमके प्रकरण काय?

अभिनेते किरण माने यांनी गुरुवारी सायंकाळी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. “काँट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड दो बीज हूँ मैं, पेड बन ही जाऊंगा!,” अशा आशयाची ही पोस्ट होती. यानंतर किरण माने यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भात खुलासा करत राजकीय भूमिकेमुळे आपल्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं सांगितलं आहे. आता यावरच अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. किरण माने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेद्वारा घराघरात पोहचले. मात्र त्यांच्या लेखणीमुळेही ते सोशल मिडीयावर प्रसिद्ध आहेत. राजकीय घडामोडींवर ते नेहमीच आपली भूमिका मांडत असतात. मात्र यावेळी केलेल्या पोस्टमुळे त्यांना मालिकेतून काढले गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटताना आता दिसून येत आहे. तर यावरच किरण माने यांनी कितीही टीका झाली तरी मी माझे मत मांडणारच अशी तटस्थ भूमिका घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!