Share

नाशिकच्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण; हायव्होल्टेज तारेचा धक्का लागल्याने तीन जवानांचा मृत्यू

Published On: 

नवी दिल्ली: नाशिकमधील ३० वर्षीय अमोल हिंमतराव पाटील (Nashik soldier Amol Himmatrao Patil) या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण आले आहे. कर्तव्यावर असताना हायव्होल्टेज तारेचा धक्का लागल्याने अमोल पाटीलसह तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अमोल हिंमतराव पाटील (Amol Patil) महाराष्ट्रातील नांदगांव तालुक्यातील रहिवासी होते. बिहारमधील नेपाळ सीमेलगत बिरपूर येथे शुक्रवारी हा प्रकार घडला. अमोल यांच्या पश्चात पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, आई, अविवाहित भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्व महाराष्ट्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान बिरपूर येथे शुक्रवारी सशस्त्र सीमा बलाच्या ४५ व्या बटालियनच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षणार्थी सैनिकांचे प्रशिक्षण सुरु होते. यावेळी ११ केव्ही उच्चदाब प्रवाहाच्या तारेचा धक्का लागल्याने तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अमोल हिंमतराव पाटील यांचा समावेश आहे. तसेच या घटनेत एकूण दहा जण जखमी झाले.त्यांना बिरपूरच्या ललित नारायण उपविभागीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर चार गंभीर जवानांना दरभंगा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे.
या घटनेनंतर अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. याठिकाणी हायव्होल्टेज तारा काढण्यासाठी संबंधित वीज विभागाला अनेकदा पत्रे लिहिण्यात आली होती. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने संबंधित प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान अमोल पाटील यांचे पार्थिव बोलठाण येथे आणण्यात येणार असून,सर्व कोरोना नियम पाळून त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. असे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!