चेन्नई : अण्णाद्रमुकचे माजी मंत्री एम मणिकंदन यांना चेन्नई पोलिसांनी अटक केली आहे. मणिकंदन यांच्यावर एका मलेशियन महिलेवर बलात्कार करून जबरदस्तीने तिचा गर्भपात केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामिन अर्जही फेटाळला आहे.
माणिकानंदन यांनी गर्भपात केल्याचा आरोप फेटाळण्यापूर्वी त्या महिलेस ओळखण्यासही नकारही दिला होता. या महिलेला ओळखत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर नंतर हे प्रकरण वाढत असल्याचे पाहून त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने ती फेटाळून लावली. तेव्हापासून ते अटक टाळण्यासाठी प्रयत्न करीत होते. आज रविवारी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
Former AIADMK minister M Manikandan arrested in Bengaluru by Chennai City Police for allegedly raping a Malaysian woman, causing miscarriage as well as for criminal intimidation. He was evading arrest after Madras High Court had refused him anticipatory bail: Tamil Nadu Police
— ANI (@ANI) June 20, 2021
काय आहे प्रकरण?
मलेशियन टूरिझम डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये कार्यरत असताना मणिकंदन यांची मे २०१७ मध्ये मलेशियन अभिनेत्रीशी ओळख झाली होती. फिर्यादीच्या तक्रारीनुसार तत्कालीन मंत्र्यांनी पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर मलेशियन अभिनेत्रीशी लग्न करण्याची विनंती केली होती. फिर्यादीत म्हटले आहे की आरोपीने तिला तीनदा गर्भपात करण्यास भाग पाडले आणि जबरदस्तीने आणि क्रूर रीतीने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले होते.
महत्वाच्या बातम्या
- केजरीवाल सरकार शहिदांच्या कुटुंबीयांना देणार १ कोटी
- राफेल विमाने २०२२ पर्यंत हवाई दलात, हवाईदल प्रमुखांची माहिती
- सदाभाऊ खोत यांनी घेतली आण्णा हजारेंची भेट ; केली ‘या’ विषयावर चर्चा
- ‘ठाकरे सरकारला कोरोनाची लागण ; हे सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही’
- ‘स्वबळाच्या गोंधळातून बाहेर पडा’ ; संजय राऊतांचा काँग्रेसला टोला


