नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी खेळाडू विनोद कांबळी (Vinod Kambli) सायबर फ्रॉडचा बळी ठरला आहे. सायबर फ्रॉडचा बळी ठरलेल्या कांबळीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आपल्या सोबत घडलेला सर्व प्रकार त्याने वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये उघड केला आहे. तसेच त्याने एफआयआर देखील नोंदवली आहे.
हा सर्व प्रकार पोलिसांनच्या लक्षात आला असता त्यांनी याचा खुलासा केला आहे. बँक कर्मचारी असल्याचे भासवत एका व्यक्तीने एक लिंक पाठवली ज्याद्वारे ही फसवणूक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘अज्ञात व्यक्तीने आधी बँक अधिकारी असल्याचे भासवत लिंक पाठवली. कांबळीने ती लिंक उघडली आणि काही वेळातच त्याच्या खात्यातून लाखो रुपये निघून गेले. पोलिसांनी मंगळवारी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आणि आता आरोपीचा शोध सुरू आहे.
एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेशी बोलताना कांबली म्हणाले, ‘ही घटना ३ डिसेंबर रोजी घडली. आपल्या देशात फसवणुकीचे गुन्हे वाढत आहेत हे खरोखरच निंदनीय आहे. मला माझे पैसे परत देण्यात आले आहेत परंतु अनेक प्रकरणांमध्ये असे घोटाळेबाज आणि फसवणूक करणारे सापडत नाहीत. असे गुन्हे आणि गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी मी पोलिसांना शक्य ती सर्व मदत करेन. माझ्या देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून मी एवढेच करू शकतो.’
Mumbai: An FIR registered at Bandra Police Station, against unidentified person, based on a complaint by former cricketer Vinod Kambli of being duped of Rs 1,13,998 on the pretext of KYC update.
(File photo) pic.twitter.com/CsNoQY1cWd
— ANI (@ANI) December 10, 2021
देशात सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. अलिकडच्या वर्षांत अशा असंख्य घटना घडल्या आहेत. आता गुन्हेगारांचे मनोबल इतके वाढले आहे की आता ते सेलिब्रिटींनाही लक्ष्य करण्यात कमी पडत नाहीत.
महत्वाच्या बातम्या :
- कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्यापूर्वी निवड समितीने ‘या’ दोघांचा नाही घेतला सल्ला!
- भारत लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी तयार- पंतप्रधान मोदी
- कतरिना-विकीवर शुभेच्छांचा वर्षाव; बॉलिवूड कलाकारांच्या हटके कमेंट्स चर्चेत
- ‘युपीत रामराज्य प्रस्थपित झाले, अभिनंदन योगीजी!’
- जात-पात भाषा भेद न करता मूलभूत हक्कांचे रक्षण करणे प्रत्येकाची जबाबदारी-निलेश राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

