नवी दिल्ली : भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहलीची हकालपट्टी झाल्यापासून अनेक गोष्टी सातत्याने समोर येत आहेत. त्याच संबंधित आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. एका वृत्तानुसार, निवडकर्त्यांनी विराट कोहलीला वनडे कर्णधारपदावरून काढून टाकण्यापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्याशी चर्चा केली नाही.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, कोहलीला कर्णधार पदावरून हटवण्याबाबत निवडकर्त्यांनी सौरव गांगुली आणि जय शाह यांच्यासोबत कोणतीही चर्चा केली नाही. तसेच विराट कोहलीलाही स्वतःहून कर्णधारपद सोडण्यास सांगितले गेले नाही किंवा त्याला असा कोणताही अल्टिमेटम मिळालेला नाही.
त्याचवेळी बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यापूर्वी सांगितले होते की, कोहलीबाबतचा निर्णय बीसीसीआय आणि निवड समितीने एकत्रितपणे घेतला आहे. हा निर्णय बीसीसीआय आणि निवड समितीने मिळून घेतल्याचे गांगुली म्हणाला. विराट कोहलीला बीसीसीआयने टी-२० कर्णधारपद सोडू नये, अशी विनंती केली होती पण तो यास मान्य झाला नाही. एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटमध्ये दोन कर्णधार असणे निवडकर्त्यांना योग्य वाटले नाही. त्यामुळे विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार आणि रोहित शर्मा एकदिवसीय आणि टी २० कर्णधार म्हणून काम पाहणार हे निश्चित झाले.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून आयसीसीच्या तीन स्पर्धांमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला; रोहितचे मोठे वक्तव्य
- जंगलपहाडातला योद्धा शेवटी जंगलातच कोसळला- संजय राऊत
- मानवी हक्कांचा आदर करणे आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांपैकी एक आहे- नवाब मलिक
- ‘विराटला टी-२० कर्णधारपद न सोडण्याची केली होती विनंती, पण…; सौरव गांगुलीचा खुलासा
- ‘अर्थ स्पष्ट आहे यांना ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही, केंद्राच्या नावाने हात पाय…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

