🕒 1 min read
कणकवली: संतोष परब हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेले आमदार नितेश राणे यांच्यावर कणकवली कोर्टात सुनावणी झाली. त्यात पोलिसांकडून त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील प्रदीप घटत यांनी केली आहे. परंतु न्यालयायाने त्यांना १८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. तसेच राणे आज सत्र न्यायालयात जमीन अर्ज करणार आहेत.
सिंधुदुर्ग कोर्टाने त्यांचा अटक पूर्व जमीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पोलिसांना शरण जात स्वतःला स्वाधीन करून दिले होते. त्यानंतर त्यांना २ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक काळात त्यांनी गुंड पाठवून हल्ला घडवून आणला होता. त्याप्रकरणी कोकणात राजकारण फारच तापले होते. राणे त्याप्रकरणी काही दिवस अज्ञातवासात देखील होते. अखेर पोलिसांना ते शरण आले होते.
महत्वाच्या बातम्या:
- संसदेतही पवार-विखे वादाचे पडसाद; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “खाल्ल्या मिठाला जागावं…”
- “मुंबईकरांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारा अर्थसंकल्प”, प्रवीण दरेकरांची टीका
- ‘इको-बटालियन’च्या माध्यमातून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास; भगतसिंग कोश्यारींचे प्रतिपादन!
- ‘तुम्ही तोंड सांभाळून बोला’; चंद्रकांत पाटलांचा नवाब मलिकांना इशारा
- औरंगाबाद शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला; निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा-चंद्रकांत खैरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
