Share

पुण्यातील प्रसिद्ध गणेश मंदिरात भाविकांची गर्दी

Published On: 

पुणे: हिंदू धर्मातील आद्य दैवत म्हणजे श्री.गणेश आज दिनांक ४ फेब्रुवारी हिंदू तिथी नुसार संपूर्ण भारतात गणेश जयंती साजरी केली जाते. माघ शुक्ल पक्ष चतुर्थी म्हणजे गणेश जयंती होय.आज गणेश जयंती निमित्त पुणे शहरातील अनेक प्रसिद्ध गणेश मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. पुणे शहराच्या मध्यभागी असलेल्या शिवाजी रस्त्यावर स्थित असणाऱ्या श्रीमंत.दगडूशेठ गणपती मंदिरात सुद्धा भाविकांनी श्री. गणेशाचे दर्शन घायला गर्दी केली होती. गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया च्या निनादाने ‘दगडूशेठ’ चा गणेशजन्म सोहळा संपन्न अतिशय उत्साहात संपन्न झाला.

श्रीमंत दगडूशेठ मंदिरावर केलेली कामधेनू प्रतिमांची आणि विविधरंगी फुलांची आकर्षक आरास बघून गणेश भाविक पण थक्क झाले होते . अशा मनोहारी सजावटीने मंदिर परिसर अधिकच खुलला आहे. तर पुण्याचे ग्रादैवत असलेल्या श्री.कसबा गणपती मंदिरात पण गणेश भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली आहे. तर श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी स्थापन केलेल्या तळ्यातील गणपतीच्या दर्शनाला सुद्धा भाविकांची गर्दी झाली आहे.

पुणे शहरातील मध्यभागी असणाऱ्या सर्वच गणेश मंदिरात गणेश भाविकांनी दर्शन घेण्यासाठी  गर्दी केल्याने पुणे वाहतूक पोलिसांनी शहरातील मध्यवर्ती भागाच्या वाहतूकीत मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत.  सकाळी ८ ते ११ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ यावेळेत दगडूशेठ मंदिरात गणेश याग होणार आहे.  नगरप्रदक्षिणा सायंकाळी ६.३० वाजता दगडूशेठ गणपती मंदिरापासून लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरापर्यंत चांदीच्या पालखीतून काढण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता श्रीगणेशाची मंगलआरती होईल.

         महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!