चेन्नई : मगंळवारी चेन्नई येथे झालेल्या आयपीएलच्या अंत्यत चुरशीच्या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने विजयाची गुढी उभारत कोलकाता नाइट रायडर्सचा १० धावांनी पराभव केला आहे. या विजयासोबत मुंबईने या मोसमातील आपल्या पहिल्याच विजयाची नोंद केली आहे. तसेच कोलकाताविरुद्ध विजयाची पंरपरा कायम ठेवली आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने १५३ धावा केल्या. यात मुंबईचा मधल्या फळीतील फलंदाज सुर्यकुमार यादवचा महत्वाचा वाटा होता. सुर्यकुमारने या सामन्यात ३६ चेंडुत ५६ धावा केल्या. या खेळीत ७ चौकार आणि २ षटकार लगावले. १०व्या षटकात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर सुर्यकुमारने ९९ मीटर उंचीचा हेलिकॉप्टर लगावला. या षटकारानंतर मुंबईच्या ड्रेसींग रुममधील हार्दिक पांड्याही अवाक झाला. त्याने उभे राहुन सुर्यकुमारचे कौतुक केले.
https://twitter.com/iamtausif5/status/1381989756389654533
सलामीवीर डिकॉक लवकर बाद झाल्याने सुर्यकुमारला तिसऱ्याच षटकात फलंदाजीला यावे लागले. सुर्यकुमार आणि रोहितने मुंबईचा डाव सावरताना ७६ धावांची भागीदारी रचली. सुर्यकुमारच्या अर्धशतकामुळे आणि रोहितने केलेल्या ४३ धावांच्या खेळीमुळे मुंबईला १५२ धावांचा टप्पा गाठता आला. १५३ धावांचा पाठलाग करताना कोलकाता संघाला १४२ धावांवरच समाधान मानावे लागले.
महत्वाच्या बातम्या
- रमजान महिन्यासंदर्भात राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी
- दररोज २५ हजार जणांना लस द्या, जालना; पालकमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश
- मराठवाड्याला अवकाळीचा फटका; नांदेडमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू, दोन म्हशी दगावल्या
- अर्धशतक हुकले तरीही हिटमॅनने रचला एक विक्रम
- दिलासा! यंदा देशात सरासरी १०३ टक्के पावसाचा अंदाज


