जालना: मागील काही दिवसांपासून मोबाईल रेंज नाही म्हणून, सगळीकडे ओरड सुरु आहे, अंबड तालुक्यातील मठपिंपळगावसह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून काही खाजगी कंपनीच्या रेंजअभावी ग्राहक पूर्णपणे वैतागले असून अनेक मोबाईलधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मोबाईल कंपन्यांनी अगोदर वेगवेगळ्या ऑफर देत ग्राहकांना आकर्षित केले. नंतर ग्राहकाची संख्या वाढल्यानंतर कंपन्यांनी महागडे रिचार्ज प्लॅन ग्राहकांच्या माथी मारले.त्यामुळे ग्राहकांना नाविलाजाने ते रिजार्च केले. या भागात विशेषत: वोडाफोन,आयडिया कंपन्यांची ग्राहक संख्या अधिक आहे.
परंतु, कंपनीचे टावर असूनही परिसरात या मोबाईल कंपनीच्या अंतर्गत नियम व समस्येमुळे त्याचा ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. टॉवरला शेतीतील थ्रीफेज लाईट आहे. ती दिवसातून फक्त आठच तास राहते. लाईट गेल्यास तर रेंजच राहत नाही. कंपनीचे दहा वर्षांपूर्वीचे जनरेटर आहे. परंतु कंपनीला मेंटेनन्स अभावी त्या चालू केल्या जात नाही. हा एक प्रश्न ग्राहकांना आहे. दुसरीकडे दर वाढूनही सेवा मिळत नसल्याने ग्राहकाकडून संताप व्यक्त होत आहे.
काही आपतकालीन किंवा दवाखाना व इतर काम असल्यास कोणास फोन लावायचा झाल्यास रेंजअभावी तो लावता येत नाही . काही वेळेस फोन लागल्यास कॉलमध्येच कट होत आहे.सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता शाळाही काही दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अभ्यास कसा करायचा? हा प्रश्न त्यांच्यापुढे असणार आहे. ही समस्या अशीच राहिली तर गावकरी ग्राहक मंचाकडे धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- दररोज २५ हजार जणांना लस द्या, जालना; पालकमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश
- मराठवाड्याला अवकाळीचा फटका; नांदेडमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू, दोन म्हशी दगावल्या
- अर्धशतक हुकले तरीही हिटमॅनने रचला एक विक्रम
- दिलासा! यंदा देशात सरासरी १०३ टक्के पावसाचा अंदाज
- पहिला चेंडु टाकण्याआधिच हिटमॅनचा पाय मुरगळला; गोलंदाजी करतानाचा व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

