Share

आज रात्रीपासून राज्यात सर्वत्र संचारबंदी, नियमांचा भंग केल्यास होणार कठोर कारवाई

Published On: 

मुंबई – कोरोना संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री 8 वाजेपासून 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात 144 कलम लागू राहील. हा निर्णय घेतानाच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारेही अनेक महत्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आले आहेत. जीवनावश्यक बाबींवर कुठलेही निर्बंध न ठेवता इतर बाबींवर परिणामांचा सारासार विचार करून निर्बंध जारी करण्यात आले आहेत.

त्याअंतर्गत काय सुरू राहील आणि काय बंद असेल, कुठल्या सेवा, आस्थापना सुरू असतील, कुठल्या बाबींसाठी सूट असेल याबाबतची माहिती काल रात्री जारी करण्यात आलेल्या नियमावलीत देण्यात आली आहे. नियमावलीनुसार रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येत असून राज्यभर कलम 144 लागू होणार आहे. निर्बंधांतून सूट असलेल्यां व्यक्तींव्यतिरिक्त कोणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी फिरू शकणार नाही.

सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणं, उपक्रम, सेवा बंद राहतील. जीवनावश्यक श्रेणीत मोडणाऱ्या सेवा आणि व्यवहार हे यातून वगळण्यात आले आहेत. अपवाद श्रेणीत असलेल्या सेवा आणि व्यवहारांना सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत परवानगी राहील.

मोलकरणी, घरगुती कामगार, वाहन चालक, वैयक्तिक निगारक्षक यांची सेवा अपवादश्रेणीत घेण्यासंदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचे आहेत.जीवनावश्यक श्रेणीत रुग्णालयांसह सर्व आरोग्य सेवा, वैद्यकीय विमा कार्यालयं, औषध दुकाने, औषध कंपन्या, लसींचं उत्पादन आणि वितरण, सँनेटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरणं, इतर पूरक उत्पादनं आणि सेवांचा समावेश राहील.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!