🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसापासुन बीसीसीआय भारताच्या महिला आणि पुरुष क्रिकेट संघात भेदभाव करत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. बुधवारी १९ मे रोजी महिला क्रिकेटपटुच्या वार्षिक करार जाहीर होताच पुन्हा या चर्चाना उत आला होता. यानंतर २०२० साली पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम खेळाडूना मिळाली नाही हा प्रकार समोर आला.
या प्रकरणात आता इंग्लंडची माजी क्रिकेटपटु इशा गुहाने उडी घेतली आहे. इशाने या प्रकरणावर मात करण्यासाठी महिला खेळाडूसाठी एक प्लेयर्स असोसिएशन असावे अशी मागणी केली आहे. पुरुषाच्या बाबतीत जितका विचार केला जातो तीतका विचार जर महिलांच्या बाबतीत केला गेला तर भारतीय महिला क्रिकेट संघ नक्किच यशस्वी होईल असे इशा गुहा म्हणाली. महिलांना योग्य न्याय मिळण्यासाठी समान वेतनाशिवाय इतरही पर्याय आहेत. असे इशाने सुचविले.
Women are made to feel grateful for progress but there is still so much to be done to reach equity (& that isn’t just equal pay). Players associations are a vital part of reaching this. ???????? women will dominate the ???? stage when as much thought goes into the their game as the men https://t.co/W4ouvLe21x
— Isa Guha (@isaguha) May 23, 2021
गेल्या काही दिवसापासुन बीसीसीआय महिला आणि पुरुष क्रिकेट संघात भेदभाव करत असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. वेळोवेळी महिला क्रिकेटपटुंनी समोर येत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला आई आणि बहिणीला कोरोनामुळे गमावलेल्या वेदा कृष्णमुर्तीला बीसीसीआयने संपर्क केला नसल्याचा आरोप केला जात होता. त्यानंतर इंग्लंड दौऱ्याविषयी. यानंतर बीसीसीआयचा वार्षिक करारवरुन पुन्हा वांदग निर्माण झाले. या वादावर स्म्रिती मधांनाने बाजु सावरली. पण पुन्हा विश्वचषक २०२० स्पर्धेचा नवा प्रकार उघडकीस आला.
महत्वाच्या बातम्या
- ‘आता मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा तसेच मातोश्रीवर शांतीयज्ञ करण्याची गरज आहे’
- मुंबई : भाजपाच्या इशाऱ्यानंतर अखेर वृक्ष छाटणीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणात मंजूर
- ‘आमदार शिंदे केवळ कोविड सेंटरचे उद्घाटन करुन जबाबदारी पार पाडल्याचा आव आणत आहेत’
- राजगडाच्या मातीतून ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा; सह्याद्री प्रतिष्ठानला सापडल्या अनमोल गोष्टी !
- लहान मुलांकरिता स्वतंत्र कोविड सेंटरची उभारणी करा; महापालिका आयुक्तांकडे भाजपची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
