Share

‘आता मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा तसेच मातोश्रीवर शांतीयज्ञ करण्याची गरज आहे’

Published On: 

मुंबई : काही महिन्यांपूर्वी राज्यात विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नेमणूकीवरून मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. आता हाच मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आणि आणि माहिती अधिकारातून अशी १२ सदस्यांची कोणतीही यादी विधानभवनात उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नेमणुकीचा मुद्दासंदर्भात माहिती विचारली होती. त्यावेळी राजभवनाच्या सचिवालयानं यासंदर्भातील यादी उपलब्ध नसल्याचं सांगितलं आहे. सामनातून याचा समाचार घेण्यात आला आहे. हा भूताटकीचा प्रकार असून राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी भुतांनी पळवल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे. तसेच गतिमान प्रशासनाच्या व्याख्येत महाराष्ट्राचे राजभवन बसत नाही काय? असा प्रश्नही सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान, आता याच मुद्द्यावरून खासदार नारायण राणे यांनी तोफ डागली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या २४ मे रोजीचा फाईल भुतांनी पळवली, हा अग्रलेख वाचला. तो अग्रलेख वाचल्यानंतर मला असे वाटते की, आता मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा तसेच मातोश्रीवर शांतीयज्ञ करण्याची गरज आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. आघाडी सरकार हे शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस अशा तीन पक्षांचे आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेने माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा मान, सन्मान ठेवण्याची गरज असताना कालच्या संपादकीयमध्ये सन्माननीय संजय राऊत यांनी ज्या भाषेत लेख लिहिला आहे. त्यासाठी वापरलेली भाषा अत्यंत खालच्या दर्जाची आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे.

संजय राऊत हे सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांचे सल्लागार आहेत. शिवाय ते त्यांची वकिलीही करतात. मी त्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी राज्यपालांवर टीका करण्याआधी राज्य (उद्धव ठाकरे यांचे) कसे चालले आहे? जनतेचे काय हाल होत आहेत? हे जाणून घ्यावे असा सल्ला देखील राणे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!