रांची – देशात सध्या कोरोनाची लाट आली असून या लाटेतून लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी विविध उपयोजना केल्या जात आहेत. दुसऱ्या बाजूला देशभरात लसीकरण केले जात असून लस मिळविण्याकरिता लांब रांगा लागल्याचे देखील काही ठिकाणी पाहायला मिळत आहे.
एका बाजूला हे चित्र असताना दुसऱ्या बाजूला देशाच्या विविध राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.सर्वसामान्य नागरिकांसह,अनेक नेते,खेळाडू,कलाकार कोरोनाच्या विळख्यात अडकून मृत्युमुखी पडत आहेत. यातच आता भाजपचे माजी खासदार आणि झारखंड राज्याचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण गिलुआ यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.
लक्ष्मण गिलुआ यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जमशेदपुरच्या टाटा मोटर्स हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. 23 एप्रिलला तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना रेमडेसिवीरची लस देण्यात आली होती, तरी सुद्धा तब्येतीत कोणतीही सुधारणा झाली नाही, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
लक्ष्मण गिलुआ हे 1990 मध्ये चक्रधरपूरचे भाजप अध्यक्ष बनले. 1995 मध्ये बिहार विधानसभेची निवडणूक जिंकत बिहार विधानसभेचे सदस्य बनले. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवत खासदार बनले.
महत्वाच्या बातम्या
- राज्य सरकारने आकडेवारीची लपवाछपवी करू नये-फडणवीस
- ‘युपी, गुजरातपेक्षा महाराष्ट्रात परिस्थिती चांगली’, मेधा पाटकर यांची प्रतिक्रिया
- ‘सभा, कमी लसीकरणामुळे भारतात परिस्थिती बिघडली’, डब्ल्यूएचओने सुनावले
- Big Breaking : पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान बॉम्बस्फोट
- ‘मोदींच्या मुत्सद्दीपणामुळे विदेशातून मदतीचा ओघ’, देवेंद्र फडणवीस यांचा दावा


