Share

Big Breaking : पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान बॉम्बस्फोट

Published On: 

कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक आणि हत्या, गोंधळ असे समिकरण कायम आहे. विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली असून या दरम्यान अज्ञात समाजकंटांनी बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत. ३ ठिकाणी झालेल्या या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याची माहिती सुरक्षा व्यवस्थेने दिली आहे. उत्तर कोलकाता, रबींद्र सारणी आणि बिधान सारणी या भागात हे बॉम्ब फेकण्यात आले असल्याचे न्यूज एजन्सीने सांगितले आहे.

पश्चिम बंगालमध्ये आठव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये ३५ विधानसभा मतदार संघात मतदान सुरू आहे. मात्र, या बॉम्ब स्फोटानंतर भाजप आणि टीएमसी यांनी एकमेकांवर आरोप केले आहे. टीएमसी घाबरली असल्याने त्यांनी हे बॉम्ब फेकले असल्याचा आरोप जोरासांको मतदार संघातील भाजप उमेदवारने केला आहे. तर टीएमसीने पलटवार करत भाजपवर आरोप केले आहेत.

या घटनेनंतर या परिसरात काही वेळ तनावाचे वातावरण होते. मात्र पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. या संदर्भात पोलिसांनी काही ठिकाणी छापेमारी देखील केली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून मतदान प्रक्रियेत यामुळे कोणताही अडथळा आलेला नाही. ३५ मतदार संघातील जवळपास सर्वच मतदान केंद्रात सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावलेल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!