पुणे : भाजपचे पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरून शिवीगीळ केली. कांबळे यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत केलेली शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.
ही ऑडिओ क्लीप व्हायरल होताच शिवसेना,मनसे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने भाजपवर हल्लाबोल केला असल्याचे सकाळपासूनच पाहायला मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्वीट करत आमदार सुनील कांबळे यांना भाजपने निलंबित करावे अशी देखील मागणी केली आहे. दम्यान आता या सर्व प्रकरणावर भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी भाष्य केले आहे.
या ऑडिओ क्लीपबाबत बोलताना ते म्हणाले कि, ‘ऑडिओ क्लीप मधील आवाज माझा नाहीये. विरोधकांनी जाणून बुजून, मोड तोड करून अशा प्रकारची क्लीप बनवून मला बदनाम केले आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांत विरोधकांना मी जड जाणार आहे. यामुळेच माझ्याविरोधात हे षडयंत्र रचले आहे. त्यामुळे मी या विरोधात मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यामुळे हि ऑडिओ क्लीप कोणी खोडसाळपणे बनवली आणि कोणी व्हायरल केली याची चोकशी आता पोलीस करतील.’ असे मत सुनील कांबळे यांनी आता व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून धोनीने मानलेल्या भावाला म्हणजेच ब्राव्होला संघाबाहेर ठेवलं
- औरंगाबादेत शिवसेनेच्या माजी महापौरांच्या कन्येची कौतुकास्पद कामगिरी, युपीएससी परिक्षेत ५१९ वा रँक!
- ‘कोणीही टाळ्या वाजवल्या नाहीत’; संयुक्त राष्ट्राच्या सभेतील मोदींच्या भाषणावर चिदंबरम यांची टीका
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- विद्यार्थ्यांच्या हितासाठीच ‘त्या’ परीक्षा पुढे ढकलल्या; आता टोपेंनी सांगितल्या संभाव्य तारखा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
