🕒 1 min read
मुंबई : दसरा मेळाव्याच्या चर्चा रंगू लागल्या असतानाच, काल शिवसेनेच्या वतीने नेस्को सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. हा दसरा मेळाव्याचा एक ट्रेलर असल्याचं बोललं जात आहे. या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजप पक्षाला चांगलंच लक्ष्य करण्यात आलं. त्याचबरोबर भाजप पक्षातील नेत्यांकडून ठाकरे घराण्यावर टीका करण्यात येत होत्या. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे.
उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य –
आज वशंवादावरून माझ्यावर टीका होत आहे. माझ्या घराण्यावर टीका होते आहे. मात्र, मला माझ्या वंशाचा आणि माझ्या घरण्याचा मला अभिमान आहे,असं उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यामध्ये म्हटलं.
पुढे ते असंही म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समिती फोडणारे हे जनसंघ होते. मात्र, तुमच्या वंशावरूनच वाद आहेत. भाजपने पक्षात केवळ उपरे भरून ठेवले आहेत की आता तुमचे बावनकुळे की एकशे बावनकुळे हेच कळत नाही आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.
हिंमत असेल तर महिनाभरात निवडणुका घ्याव्यात-
तसेच, उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंमत असेल तर महिनाभरात. मुंबई महापालिका आणि राज्य विधानसभा निवडणूक घेऊन दाखवावी, असे आव्हानही दिले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray । गिधाडांना मुंबईचा लचका तोडू देऊ नका; उद्धव ठाकरेंच शिवसैनिकांना आवाहन
- Uddhav Thackeray | महिनाभरात निवडणुका घ्या, उद्धव ठाकरे यांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान
- Uddhav Thackeray : मुलं पळवणारे होते, आता बाप पळवणारे आलेत; ठाकरी तोफ धडाडली
- Raju Srivastav Death | जाता जाता सर्वांना हसवून गेले राजू श्रीवास्तव, कॉमेडियनचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल
- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या महिलांना रौप्य तर पुरुषांना कांस्य पदक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
