🕒 1 min read
औरंगाबाद:- राज्यातील मुदत संपणार्या आणि लांबणीवर पडलेल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारीला मतदान होत आहे. परंतु, आता सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर काढण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
पुण्यातील मारहाण प्रकरणावरुन पुन्हा एकदा चर्चेत आलेले कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव ग्रामपंचायतीच्या राजकारणातून बाद होण्याची शक्यता आहे. तर हर्षवर्धन जाधव ऐवजी त्यांच्या पत्नी आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या
कन्या संजना जाधव यांनी ग्रामपंतायतींसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. कन्नड तालुक्यातील अनेक गावांमध्ये संजना जाधव यांनी पॅनल उतरवण्याची तयारी सुरु केली आहे.
दरम्यान, माझे बाबा हर्षवर्धन जाधव हे जनतेच्या कामासाठी मोठ्या नामांकित लोकांशी भांडले. शेतकरी, कामगार मजुर आणि कन्नड-सोयगाव मतदारसंघातील लोकांसाठी ते सतत काम करत आहे. अजूनही त्यांना जनतेसाठी खूप काही करायचे आहे, सध्या ते अडचणीतून जात असले तरी त्यांनी पुन्हा राजकारणात सक्रीय होण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये आम्ही उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे चिरंजीव आदित्यवर्धन जाधव यांनी केली आहे.
आदित्यवर्धन यांच्या निमित्ताने जाधव घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात उतरण्याच्या तयारीत असल्याचे हे संकेत असल्याचे बोलले जाते. हर्षवर्धन जाधव यांनी जेव्हा शिवसेनेचा राजीनामा देऊन स्वतःचा पक्ष काढला होता, तेव्हा आदित्यवर्धन यांनी सर्वप्रथम व्यासपीठावर उभे राहून भाषण केले होते. आता ग्रामपंचायत निवडणुकीत हर्षवर्धन जाधव विरुध्द संजना जाधव असा माय-लेकांत संघर्ष होऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या
- ‘प्रिय एनसीबी, ती आली आहे आपण कधी कॉल कराल?’ सचिन सावंतांचा कंगनाला टोला
- भुजबळ, वडेट्टीवारांच्या पाठीशी बारा बलुतेदार, गरज पडली तर रस्त्यावर उतरु : प्रकाश शेंडगे
- रोहित तिसऱ्या कसोटी टेस्टमध्ये खेळणार की नाही? रवी शाश्त्री यांनी केला खुलासा
- ‘पुनावाला यांचे कार्य हे महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावणारे, त्यांना महाराष्ट्र भूषण द्यावा’
- व्होडाफोन आयडिया ने आणला प्रीपेड यूजर्ससाठी खास प्लान !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
