Share

‘प्रिय एनसीबी, ती आली आहे आपण कधी कॉल कराल?’ सचिन सावंतांचा कंगनाला टोला

Published On: 

मुंबई : सुशांत सिंह प्रकरणामध्ये अमली पदार्थ सेवन करणाऱ्या अनेक बॉलीवूड कलाकारांचे नाव समोर येत आहे. NCB ने या प्रकरणात अमली पदार्थ सेवन कनेक्शन शोधून काढले आणि अनेकांची चौकशी सुरु केली आहे.

त्यातच अभिनेत्री कंगना रणौत नुकतीच मुंबईत दाखल झाली आहे. मुंबईत दाखल होताच  तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. कंगना मुंबईत दाखल होताच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्विट करत ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत असलेल्या एनसीबीला सवाल करणार ट्विट केलं आहे. ‘आपण ड्रग्जच्या आहारी गेलो होतो,’ अशी कबूली देणारा कंगनाचा व्हिडीओ ट्विट करत भाजपालाही लक्ष्य केलं.

सावंत यांनी केलेल्या ट्विट मध्ये डिअर एनसीबी, ती परत आलीये. या व्हिडीओच्या चौकशीसाठी तुम्ही कंगनाला कधी चौकशीसाठी बोलवणार आहात? कंगनाला बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटची माहिती द्यायची असल्यानं मोदी सरकारने तिला वाय श्रेणीची सुरक्षा दिली आहे. मात्र, ती अजूनही माहिती लपवत आहे, जो की गुन्हा आहे, असं म्हटलं आहे. या  ट्विटला  कंगनाने अजूनही प्रतिउत्तर दिले नाही. या ट्विट नंतर कंगना काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!