मुंबई : “देशात फक्त भाजपावालेच रोज गंगास्नान करतात व उर्वरित लोक गटारस्नान करतात असे काही आहे काय?,” असा सवाल करत शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपावर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटीशीनंतर भाजपा नेत्यांनी टीकाटिप्पणी केली होती. राज्यात ईडीच्या नोटीशीवरून राजकारण पेटताना दिसत आहे.
“संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यापासून संजय राऊत ज्याप्रकारे लिहित आहेत किंबहुना वक्तव्यं करत आहे त्यावरुन ते बिथरल्याचं दिसत आहेत. त्यांना तात्काळ मानसोपचार तज्ज्ञाला दाखवण्याची गरज आहे” अशी टीका भाजपचे नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी केली आहे.
“संजय राऊतसाहेबांना माझा मैत्रीचा सल्ला असेल की त्यांनी लवकरात लवकर एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार करुन घ्यावेत म्हणजे ते ठीक होतील” असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना व भाजपमध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झाल्याचं दिसून येत असतानाच हे ईडी प्रकरण त्यात भर असल्याचं दिसून येत आहे.
सामनातून भाजपवर हल्लाबोल –
‘काँग्रेसच्या काळात ईडीचा गैरवापर झाला नाही काय? व्वा! काय म्हणायचे या अक्कलशून्य मंडळींना! काँग्रेसने कधीकाळी चुकीचे वर्तन केले म्हणून आम्हालाही अंगास शेण फासण्याचा व शेण खाऊन थयथयाट करण्याचा अधिकार आहे असेच ते म्हणतात. मग हा शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटनाच बदलून तुम्ही ईडी कार्यालयात बसून नवी घटना लिहून काढलीत? हवाबाण थेरपीचा अतिरेक झाला की, मेंदूत सडकी हवा जाते. त्या पादऱ्या हवेच्या ढेकरा सध्या ज्यांना लागत आहेत त्यांचे नाव भाजप!’ अशी टीका सामनातून करण्यात आल्याने ती भाजपच्या जिव्हारी लागल्याचं दिसून येत आहे.
ज्या पद्धतीची भाषा शिवसेना आणि सामनाच्या अग्रलेखातून वापरली जातेय त्याची किव येते. बहुतेक मा. संजय राऊत यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे. pic.twitter.com/nb4tDeLhMa
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 30, 2020
महत्वाच्या बातम्या
- ‘पुनावाला यांचे कार्य हे महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावणारे, त्यांना महाराष्ट्र भूषण द्यावा’
- …अन चक्क उदयनराजेंनी वासुदेवालाचं दिलं आलिंगन !
- दुसरी सोय करा ! ३१ डिसेंबरला पुण्यात होम डिलिव्हरीवर देखील निर्बंध
- सीरमच्या लशीला मंजुरी भारतात मिळणार का? तज्ज्ञ समितीच्या बैठकीकडे देशाचे लक्ष
- एटीएम घोटाळ्या पासून वाचण्यासाठी पुणे पोलिसांनी केले मार्गदर्शन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

