पुणे : ब्रिटन मध्ये नवा कोरोना विषाणू आल्याचे कळताच जगभरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळल्यानंतर खबरदारी म्हणून राज्य शासनाने नाईट कर्फ्यु करण्याचा निर्णय घेतला. तसेच, नव्या कोरोनाचा प्रसार राज्यात होऊ नये यासाठी नियोजन करण्यात येत आहे.
सुरुवातीला ३१ मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर जूनपासून टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली होती. राज्य सरकारने ‘पुनःश्च हरिओम’ म्हणत दैनंदिन जनजीवन सुरळीत करण्यासाठी पावले उचलले होते. या मिशन बिगिन अगेन ची नियमावली ३१ जानेवारी २०२१ मध्ये देखील कायम ठेवण्यात आली आहे. अशातच अतिउत्साही नागरिकांना आवर घालण्यासाठी राज्य सरकारने महापालिका क्षेत्रात ५ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू केली आहे.
राज्य सरकारपाठोपाठ पुण्यात देखील आयुक्तांनी मिशन बिगिन अगेनची नियमावली जाहीर केली आहे. यासोबतच त्यांनी ३१ डिसेंबरसाठी देखील काटेकोर नियम जाहीर केले आहेत. पुण्याचे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी आज एक आदेश जारी केला आहे. यामध्ये त्यांनी ३१ डिसेंबरची नियमावलीसंदर्भातील दहा मुद्द्यांची माहिती दिली आहे. त्यानुसार ३१ डिसेंबर म्हणजेच उद्या कोणत्या गोष्टी कितीपर्यंत जाहीर असतील हे देखील सांगितलं आहे.
पुणे महानगरपालिका श्रेत्रातील सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टोरंट तसेच बार ३१ डिसेंबर रोजी रात्री पावणे अकरापर्यंतच सुरु राहणार आहेत. सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टोरंट रात्री पावणे अकराला बंद करावेत असे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे होम डिलेव्हरीची सुविधाही पावणे अकरापर्यंतच सुरु राहणार आहे, असं या पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे जर ११ नंतर होम डिलिव्हरी हवीअसेल तर ती पुणेकरांना मिळू शकणार नाही. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी पुणेकरांनी घरच्या घरीच दुसरी सोय करावी.
महत्वाच्या बातम्या
- ‘पुनावाला यांचे कार्य हे महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावणारे, त्यांना महाराष्ट्र भूषण द्यावा’
- …अन चक्क उदयनराजेंनी वासुदेवालाचं दिलं आलिंगन !
- ‘ईडीची नोटीस आली की महाविकास आघाडीचे नेते चिखलात ढकलुन दिल्यासारखं ओरडतात’
- येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत शांततेने व साधेपणाने साजरे करा – अनिल देशमुख
- ‘ईडी कार्यालयात आज हजर होणार होतोच मात्र कोरोना सदृश लक्षणांमुळे विश्रांतीची गरज आहे


