पुणे: नुकतच कोरोना साथीच्या कालावधीत देशात लॉकडाउन लागू करण्यात आल्याने लोकांकडून बाहेर जाणे टाळण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाईन ट्रांजेक्शन, त्याचबरोबर अनेकदा ग्राहक वेगवेगळ्या ऑफिसला देखील बळी पडत असतात. याचा फायदा अनेक सायबर गुन्हेगारांकडूनही घेतला जात असल्याच्या अनेक घटना आपल्या समोर आल्या आहेत.
त्यामुळे सायबर सुरक्षेबाबत अधिक जागरूक होणं आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नुकतच एचडीएफसीच्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग व पेमेंट युटिलिटीसंदर्भात व्यत्यय आल्याने रिझर्व बँकेने एचडीएफसीच्या व्यवहारांवर काही निर्बंध आणले होते. यासाठी HDFC बँकेनं देखील नुकतच एक कॅम्पेन सुरू केलं होत. तर वेळोवेळी पोलीस देखील नागरिकांना एटीएम घोटाळ्या पासून वाचण्यासाठी सूचना करत असतात.
अशाच सूचना एटीएम घोटाळ्या पासून वाचण्यासाठी पुणे पोलिसांनी नागरिकांना केल्या आहेत. यामध्ये एक व्हिडिओ बनवून नागरीकांना एटीएम मध्ये होणार्या गैर्व्याव्हारांपासून वाचण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत असू लोकांना मार्गदर्शन करत आहे.
https://twitter.com/PuneCityPolice/status/1343550106507878400
पुण्याच्या सायबर पोलीस स्टेशन च्य अधिकार्यांनी यावेळी स्वतः एटीएम मशीन वर जात हा व्हिडीओ बनवलं असून यामध्ये त्यांनी एटीएम मशीन मध्ये स्कीमर लाऊन ग्राहकांची कशी फसवणूक केली जाते याबद्दल माहिती दिली आहे. तर स्कीमर बरोबरच कॅमेरा लाऊन ग्राहकांचे कार्ड वाचले जाते. एटीएम कार्डची माहिती वाचली जाते आणि पिन मिळवतात त्यांनतर ग्राहकांच्या खात्यावर डल्ला मारला जातो.
असे दोन आरोपी पुण्याच्या सायबर पोलीस स्टेशनने पकडले असून त्यांच्या कडून ३०० ते ४०० बनावट एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी एटीएम कार्ड पिन टाकताना हाताने कीबोर्ड झाकावा. त्याच बरोबर काही वेग;ला प्रकार आढळल्यास पोलीस आणि बँकेने दिलेल्या सूचनांच पालन करण्याच आवाहन पोलिसांनी केल आहे.
महत्वाच्या बातम्या
- सीरमच्या लशीला मंजुरी भारतात मिळणार का? तज्ज्ञ समितीच्या बैठकीकडे देशाचे लक्ष
- दुसरी सोय करा ! ३१ डिसेंबरला पुण्यात होम डिलिव्हरीवर देखील निर्बंध
- अमिताभ बच्चन यांनी मागितली ‘त्या’ महिलेची माफी
- ‘जनतेसाठी माझे बाबा मोठ्या लोकांशी भांडले’; आदित्यवर्धन जाधव आईविरुद्ध शड्डू ठोकण्याच्या तयारीत
- कमला हॅरिस यांनी घेतली कोरोना लस; लसीकरणानंतर म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

