सातारा : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे १३ वे वशंज व भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे कायमच आपल्या स्टाईल आणि डायलॉगबाजीने चर्चेत असतात. साताऱ्यातील राजकारणात आपलं स्थान निर्माण करण्यासह छत्रपतींचे वंशज असल्याने त्यांचे राज्यभरात मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत.
आपल्या बिनधास्त वागण्याने अनेक किस्से घडत असतात. कार्यकर्त्याने व्यक्त केलेल्या इच्छेसाठी कधी ते रायडर बनतात, तर कधी अचानक त्यांना भेटी देतात. अशातच सद्या त्यांचा एक व्हिडीओ प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात ते चक्क वासुदेवालाच जादूच्या झप्पीने खुश करताना दिसत आहेत.
खरं तर महाराष्ट्राला संतांचा खूप मोठा वारसा लाभला आहे. हाच सांस्कृतिक वारसा टिकवण्याचं काम हे वासुदेव सकाळी सकाळी गावोगावी फिरून करत असतात. अभंगांच्या ओव्या, देवाची गाणी म्हणत ते आपल्या कर्माची आणि सद्भावनेची आठवण करून देत असतात. मात्र, वाढत्या शहरीकरणात हे वासुदेव देखील आता दिसेनासे होत आहेत.
असाच एक वासुदेव उदयनराजेंना भेटल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे वासुदेवानं गायलेले गाणं उदयनराजेंना इतकं आवडलं की त्यांनी गाणं संपताच आनंदाच्या भरात त्यांनी वासुदेवाला आलिंगन देऊन त्यांचं कौतुक केलं आहे. त्यांना ही एवढी मोठी पोहोचपावती पहिल्यांदाच आयुध्यात मिळाली असेल आणि ती देखील खुद्द छत्रपतींचे वंशज असलेल्या व खासदार उदयनराजे यांच्याकडून ! यासंदर्भात आयबीएन लोकमतने वृत्त दिलं आहे.
खासदार उदयनराजेंची जादूची छप्पी pic.twitter.com/dpriHoOB9P
— Manoj Khandekar (@manojkhandekar) December 30, 2020
महत्वाच्या बातम्या
- ‘पुनावाला यांचे कार्य हे महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावणारे, त्यांना महाराष्ट्र भूषण द्यावा’
- खुशखबर ! अॅमेझॉन च्या ‘मेगा सॅलरी डेज’ सेल मध्ये ‘या’ वस्तूंवर मिळणार ५०% सूट
- ‘ईडीची नोटीस आली की महाविकास आघाडीचे नेते चिखलात ढकलुन दिल्यासारखं ओरडतात’
- येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत शांततेने व साधेपणाने साजरे करा – अनिल देशमुख
- ‘ईडी कार्यालयात आज हजर होणार होतोच मात्र कोरोना सदृश लक्षणांमुळे विश्रांतीची गरज आहे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

