Share

वरुणराजाच्या आगमनासाठी सत्ताधारी शिवसेनेचे महादेवाला साकडे

Published On: 

औरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन एक महिना होत आहे. तरी सुद्धा सावळदबारा परिसरात जोरदार पाऊस न झाल्यामुळे परिसरातील पिके धोक्यात आली आहे. वरुणराजाचे आगमन व्हावे म्हणून सावळदबारा येथील महादेवाच्या मंदिरात शिवसेना उपतालुकाप्रमुख गुलाबराव कोलते व ग्रामस्थांनी महाआरती केली.

सावळदबारा परिसरात पाऊस नसल्याने पिके सुकून चालले आहेत. पाऊस पडावा याकरिता देवाकडे साकडे घातले जात आहे. सावळदबारा परिसरात जूनच्या पहिल्या आठवड्यात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला होता. नंतर अजूनही जोरदार पाऊस झाला नसल्याने शेतक-यांनी पेरलेले बियाणे खराब झाले आहे.

त्यामुळे वरुणराजाचे आगमन व्हावे म्हणून येथील महादेवाच्या मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख गुलाबराव कोलते, रमेश खराटे, एकनाथ सपाटे, दिनकर शिप्लकर, विजय रावळकर, बाबु सपाटे, दैलात सपकाळ, समाधान कपाटे, अतुल चव्हाण, सदिप सूर्यवंशी, सुदाम खराटे, मुकेश रावळकर, सागर वाकेकर आदी होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!