Share

औरंगाबाद जिल्हा दूध संघाच्या निवडणूकीसाठी दिग्गजांच्या जोरबैठका; कोण मारणार बाजी?

Published On: 

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे(Haribhaou Bagade) यांचा पराभव झाला होता. महाविकास आघाडी पॅनलने त्यांच्या विरोधात उमेदवार उतरवल्याने त्यावेळी भाजप उमेदवाराला पराभव पत्करावा लागला होता. आता अशाच प्रकारे होऊ घातलेल्या दूध संघाच्या निवडणुकीतही बागडे यांना हरवण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी सांगितले. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा दूध संघ ताब्यात घेण्यासाठी दिग्गजांनी जोर-बैठका सुरु केल्या आहेत. मात्र बाजी कोण मारणार? हे निवडणुकांनंतरच स्पष्ट होईल.

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक होणार आहे. यंदा ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. येणाऱ्या डिसेंबर रोजी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मतदान होईल. मात्र निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. हरिभाऊ बागडे यांनी शेवटच्या दिवशी आपला व १२ माजी संचालकांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

जिल्हा सहकारी दूध संघाच्या १४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. २३ डिसेंबरपर्यंत ६२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत़. यामध्ये आमदार हरिभाऊ बागडे तसेच राधाकिसन पठाडे यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे. शेवटच्या दिवशी १४ संचालकांच्या जागेसाठी शंभर अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जाची लवकरच पडताळणी होणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून या निवडणूका बिनविरोध होत आहेत. मात्र यंदा या निवडणुका बिनविरोध होऊ शकल्या नाही. त्यामुळे दूध संघ ताब्यात घेण्यासाठी सर्वांनीच जोर-बैठका सुरू केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!