Share

‘नियमांचे पालन करा, मगच सरकारला दोष द्या’, हायकोर्टाने बेजबाबदार नागरिकांना सुनावले

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. यामुळे बहुतांश नागरिक सरकारला दोष देत आहेत. कोरोनाचा उद्रेक रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा सूर आवळला जात आहे. पण नागरिकांनी स्वत: संयम आणि शिस्त पाळावी, कोरोना नियमांचे पालन करावे, मगच सरकारला दोष द्यावा अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने केली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या बेशिस्त नागरिकांना कोर्टाने कानपिचक्या दिल्या आहेत.

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मोठ्या गावांमध्ये अँटिजन चाचणीची सोय करावी. पुरेसा ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची प्रशासनाची जबाबदारी आहे, आपल्या जिल्ह्यात पुरेसा साठा असावा, अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली. अनेक तरुण-तरुणी विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसतात. मास्क, हेल्मेट नसलेले लोक ट्रिपल सीट, काही वेळा चार-चार लोक बाइकवर फिरतात. घराबाहेर पडताना प्रत्येकाने नाक व तोंड पूर्ण झाकले जाणारे मास्क घातलेच पाहिजेत असे निर्देश खंडपीठाने दिलेत.

राजकीय नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा
काही लोक मास्कचा केवळ नावापुरता वापर करतात. ते लोक व्यक्ती कोरोनाचे सुपरस्प्रेडर ठरू शकतात. नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करा, तसेच कारवाई न करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणाऱ्या राजकीय नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा, असे आदेश न्या. रवींद्र घुगे व न्या. बी. यू. देबडवार यांनी प्रशासनाला दिलेत.

अंत्ययात्रेला गर्दी नको
कोरोनामुळे मृतांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरातील सर्व स्मशानभूमीत विद्युतदाहिनी बसवण्याचा पर्याय प्रशासनाने तपासून पाहावा. यासाठी कृती आराखडा तयार करा. कोविड रुग्णांच्या अंत्यविधीसाठी नियमानुसार दिलेल्या परवानगीचे काटेकारेपणे पालन व्हावे. यात हलगर्जीपणा करणाऱ्याविरुद्ध कारवाई करा. अंत्यसंस्कारांच्या वेळी गर्दी झाल्यास कोरोनाचा प्रसार झपाट्याने होतो, ते रोखण्यासाठी गुन्हे दाखल करावे लागले तरी ते करावेत असे आदेश हायकोर्टाने प्रशासनाला दिलेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!